- Hindi News
- क्राईम
- शनीपेठ पोलीसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.
शनीपेठ पोलीसांची धडक कारवाई; देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.
जळगाव: प्रतिनिधी
शनीपेठ पोलिसांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका इसमास अटक करून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली.
ही कारवाई १० ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील स्मशानभूमीजवळील उमेश बियर शॉपी परिसरात करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात अवैधरित्या घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. विशाल जयस्वाल यांनी अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. १० ऑगस्ट रोजी पोलिसांना उमेश बियर शॉपीजवळ एक इसम अवैध अग्निशस्त्र बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी कारवाई करत प्रकाश तोलार, रा. खेडी, ता. जळगाव, ह.मु. साई सिटी, जळगाव यास ताब्यात घेतले. झडती दरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीचे १ पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १७२/२०२६ दाखल करण्यात आला असून, आर्म्स अॅक्ट कलम ३/२५ (१- बी) (ए) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.