- Hindi News
- राज्य
- श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..
श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..
भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे
पुणे -
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात येत्या १३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिर सकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी पूर्णवेळ खुलं ठेवण्यात येणार आहे.
श्रावण महिन्यात भीमाशंकर इथं होणारी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसंच, भीमाशंकर परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहनतळांचंही नियोजन केलं जाणार आहे.
भीमाशंकर परिसर प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी वन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. परिसरात प्लास्टिकचा वापर होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.
दरम्यान, अभिषेक आणि व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेऊन भाविकांना प्रवेश दिल्याच्या तक्रारी टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंगद्वारेच दर्शनाची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्रावण महिन्यातील गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत दर्शन मिळावं, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचं नियोजन करण्यात आलं आहे.