नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा २६ ऑगस्ट रोजी..

On

त-हाडी प्रतिनिधी -

नंदुरबार जिल्हा नाभिक समाज हितवर्धक व कर्मचारी संस्था यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात येणारा १० वा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता गजानन महाराज मंदिर, डोम  येथे उत्साहात संपन्न होणार आहे.

समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या यशाचा सन्मान व्हावा या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यावर्षी हा कार्यक्रम दहाव्या वर्षात पदार्पण करत असून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

गुणगौरवासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व्हॉट्सअॅपद्वारे पाठविण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२६ आहे. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या गुणपत्रिकांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी वेळेत गुणपत्रिका पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समाजबांधव, पालक, विद्यार्थी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमानंतर उपस्थित राहणाऱ्या सर्व समाजबांधवांसाठी दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून समाजातील जेष्ठ मंडळी उपस्थित राहणार आहे. 
तसेच गेल्या वर्षभरात जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या असतील त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे त्यांनीही आपापली नावे संस्थाचालकांकडे द्यावयाचे आहेत. असे आवाहन श्री पंकज भदाणे अध्यक्ष यांनी केलेले आहे.

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
09 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/state/student-appreciation-ceremony-of-nandurbar-district-nabhik-samaj-benevolent-and/article-119

खबरें और भी हैं

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

ताजा बातम्या

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार...
जळगाव 
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

वाकडी जि.प. शाळेत १५ ऑगस्टची 'संगीत कवायत' पूर्वतयारी; दर्जेदार शिक्षणामुळे नागरिकांकडून कौतुक

सोयगाव प्रतिनिधी सोयगाव आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट) विद्यार्थ्यांचा संगीत कवायत सराव.    सोयगाव प्रतिनिधी -ज्ञानेश्वर वाघ सोयगाव तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा...
जळगाव  मनोरंजन  क्रीडा 
वाकडी जि.प. शाळेत १५ ऑगस्टची 'संगीत कवायत' पूर्वतयारी; दर्जेदार शिक्षणामुळे नागरिकांकडून कौतुक
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved