बोरअंजटी आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस - रानभाज्या महोत्सव,शैक्षणिक,सांस्कृतिक उपक्रमानी साजरा..

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत भरली

On

चोपडा | प्रतिनिधी -

तालुक्यातील बोरअंजटी येथील धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ, सत्रासेन संचलित अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस मोठ्या उत्साहात आणि विविध शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजातील विविध क्रांतिकारक व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनातील संघर्ष, त्याग, शौर्य आणि समाजासाठी दिलेले योगदान याबाबत शिक्षकांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. आप्पासाहेब रायसिंग फुगा भादले यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी घटना, सामाजिक कार्य आणि योगदानाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगण्यात आला. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, संघर्षशीलता,  प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

 रानभाज्या महोत्सवातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन
जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी जीवनशैलीशी निगडित विविध रानभाज्या, खाद्यसंस्कृती आणि त्यांचे आरोग्यविषयक व पर्यावरणीय महत्त्व जाणून घेतले. या उपक्रमातून आदिवासी समाजाची समृद्ध पारंपरिक ज्ञानपरंपरा आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडण्यात आले.
विद्यार्थिनींनी आदिवासी संस्कृतीवर आधारित आकर्षक रांगोळी व चित्रकला, तसेच निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. या माध्यमातून आदिवासी संस्कृती, क्रांतिकारकांचे कार्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान प्रभावीपणे सादर करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत भरली
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक आदिवासी वेशभूषा, नाटिका, सांस्कृतिक सादरीकरणे तसेच आदिवासी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन सादर केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर पावरा व माध्यमिक मुख्याध्यापक भगवान भालेराव यांच्या हस्ते क्रांतिकारक व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले 
 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती
यावेळी माध्यमिक मुख्याध्यापक भगवान भालेराव, उच्च माध्यमिक शिक्षक डॉ. गोपाल पाटील, प्रा. किरण महाजन, प्रा. विजय आखाडे, प्रा. ज्ञानेश्वर पाटील, प्रा. वासुदेव पवार, प्रा. मुकेश पाटील, प्रा. ज्ञानेश्वर पावरा, ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक  देवेंद्र पाटील, सौ. नेहा भादले,  रेमसिंग पावरा, प्राथमिक मुख्याध्यापक जगदिश महाजन, पदवीधर शिक्षक सुनील कन्हैये, प्राथमिक शिक्षिका श्रीमती सीमा शिरसाठ, सौ. सपना भादले, सुशिलकुमार चव्हाण, भुषण साळुंके, लिपिक सुभाष पाटील, अधीक्षिका श्रीमती दिपाली पाटील तसेच वसतिगृह कर्मचारी संदीप पावरा, वजीर पावरा, बारकु धुमाळ, संदीप जावरे, ओमेश ठाकरे, सौ. सविता ढिवरे, योगेश पाटील, गणेश कोळी, अतुल भोई,  राजु बारेला, नानसिंग पावरा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले. 
कार्यक्रमाचे  प्रास्ताविक प्रा. मुकेश पाटील,  सूत्रसंचालन प्रा. किरण महाजन यांनी केले, आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर पाटील यांनी केले

Edited By: Shailendra Thakur
www.yourdomain.com
09 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/world-tribal-day-and-revolution-day-at-boranjati-ashram-school/article-107

खबरें और भी हैं

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

ताजा बातम्या

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

मुंबई - राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप...
मुंबई 
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार...
जळगाव 
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved