- Hindi News
- पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले २० ते २५ किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा ३ क्विंटल निंबोळ्यांचे बीजारोपण...
पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले २० ते २५ किमीच्या रस्त्याच्या दुतर्फा ३ क्विंटल निंबोळ्यांचे बीजारोपण......
प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्याकडून ट्री-गार्डसाठी १० हजारांची मदत.....
एरंडोल प्रतिनिधी -
पर्यावरण संवर्धनाची केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष कृतीचा वस्तुपाठ दाखवत कासोदा परिसरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे. कासोदा ते पारोळा मार्गावरील साईबाबा मंदिर सभागृहात ५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात तब्बल २० ते २५ किलोमीटरच्या मार्गाच्या दुतर्फा ३ क्विंटल निंबोळ्यांच्या बीजारोपणाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. एरंडोल विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या शुभहस्ते आणि महानंदाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत रोपांच्या संरक्षणासाठी प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी १० हजार रुपयांची वैयक्तिक मदत जाहीर केली.
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून परिसरातील निसर्गप्रेमी मित्रांच्या एकजुटीने हा उपक्रम साकारला आहे. या उपक्रमासाठी गेल्या तीव्र उन्हाळ्यात तीन क्विंटल निंबोळ्या खरेदी करून त्या व्यवस्थित वाळवून साठवण्यात आल्या होत्या. परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता कासोद्याहून मालखेडा, आडगाव, अंतूर्ली व वनकोठा या चारही दिशांना जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा प्रत्यक्ष बीजारोपणाला सुरुवात झाली आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपअभियंता संदीप पाटील, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी बळवंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, कासोद्याचे सरपंच पुरुषोत्तम चौधरी, जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, धिरेन कालरिया आणि कृष्णपाल सिंग हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विशेष म्हणजे गेल्या उन्हाळ्यात कडक उन्हात रोपांना पाणी देऊन ती जगवण्यासाठी अविरत परिश्रम घेणारे निसर्गप्रेमी संदीप वाघ व प्रवीण पाटील यांचा प्रांताधिकारी गायकवाड यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी उपअभियंता संदीप पाटील, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, समाधान पाटील, प्रांताधिकारी गायकवाड व महानंदा पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पाटील यांनी केले, सूत्रसंचालन ह.भ.प. संजय जमादार यांनी तर आभार सूर्यकांत पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मालखेड्याचे सरपंच सचिन पाटील, सुरेश सूर्यवंशी, महेश पांडे, उमेश पाटील, गौरव पाटील, गोपाळ पांडे, प्रीतम पटेल, प्रल्हाद पाटील, प्रवीण पाटील, उमेश नवाल यांच्यासह परिसरातील विविध गावांचे सरपंच व पोलीस पाटलांनी विशेष परिश्रम घेतले.