कोतूळमध्ये स्वाध्याय परिवाराच्या व्हिडिओ प्रवचन केंद्राचा शुभारंभ

On

कोतूळ -  स्वाध्याय परिवाराच्या वतीने कोतूळ येथे नव्याने उभारण्यात आलेल्या व्हिडिओ प्रवचन केंद्राचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अकोले तालुक्यातील विविध गावांतील स्वाध्याय भाऊ-ताई मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षण म्हणून परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले (दादाजी) यांच्या प्रेरणादायी व्हिडिओ प्रवचनाचे सामूहिक श्रवण करण्यात आले. दादाजींनी मांडलेले मनुष्य गौरव, निसर्गपूजा, भक्तियोग, निस्वार्थ सेवा, कुटुंबप्रेम आणि सामाजिक एकात्मता यांवरील विचारांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. प्रवचनादरम्यान संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक भावनेने भारावून गेला.

स्वाध्याय परिवाराचे कार्य या परिसरात सन १९७९ पासून सातत्याने सुरू असून आज अनेक कुटुंबे या आध्यात्मिक चळवळीशी जोडली गेली आहेत. गावात स्वाध्याय केंद्र, महिला केंद्र, युवा केंद्र, युवती केंद्र, बालसंस्कार केंद्र तसेच योगेश्वर कृषी यांसारखे विविध उपक्रम नियमितपणे राबविले जात असून त्यातून संस्कारक्षम आणि सुसंवादी समाज घडविण्याचे कार्य सुरू आहे.

नवीन व्हिडिओ प्रवचन केंद्रामुळे परिसरातील स्वाध्यायांना नियमितपणे दादाजींचे विचार, मार्गदर्शन आणि तत्त्वज्ञान ऐकण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे समाजात संस्कार, भक्ती, परस्पर प्रेम, सामाजिक बांधिलकी आणि एकात्मतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास उपस्थित स्वाध्याय बंधू-भगिनींनी व्यक्त केला.

कार्यक्रमास स्वाध्याय परिवाराचे कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच अकोले तालुक्यातील विविध गावांतील स्वाध्याय बंधू-भगिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
02 Aug 2026 By sandeep patil

कोतूळमध्ये स्वाध्याय परिवाराच्या व्हिडिओ प्रवचन केंद्राचा शुभारंभ

pngtree-breaking-news-vector-icon-illustration-logo-design-png-image_8795960

https://www.maharashtrasarthi.com/inauguration-of-the-swadhyay-pariwar-s-video-discourse-center-in-kotul/article-89

खबरें और भी हैं

मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

ताजा बातम्या

LIVEमुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

मुंबई - महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी...
मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’

अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल...
निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’

नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

नंदुरबार - नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ व जिल्हा युवा उन्नती मंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने...
नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित उच्च माध्यमिक विदयालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पारोळा - येथील उच्च माध्यमिक विद्यालयात आज (ता.29) रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम  उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन...
री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित उच्च माध्यमिक विदयालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved
Powered By Vedanta Software