- Hindi News
- री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित उच्च माध्यमिक विदयालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित उच्च माध्यमिक विदयालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
पारोळा - येथील उच्च माध्यमिक विद्यालयात आज (ता.29) रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन प्रा. डी. बी.पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव प्रा. छाया पाटील, उपाध्यक्ष डॉ. आदित्य पाटील, डॉ. खुशी पाटील, प्राचार्य उमेश पाटील विशेष अतिथी म्हणून पारोळा पोष्ट ऑफिसचे व्यवस्थापक उमेश राहाणे, विजय पाटील, विजय देसले उपस्थित होते.
प्रा. डी. बी. पाटील व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते महर्षीव्यास व दत्त गुरुंच्या प्रतिमापूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमिताने अध्यक्षांचा व सर्वप्रमुख मान्यवरांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
गुरुपौर्णिमा या कार्यक्रमाच्या निमिताने विद्यार्थ्याच्या वतीने सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कु.रितू बोरसे हिने सुंदर अशा गीतगायनाने गुरुना गुरुवंदना प्रदान केली. तद्नंतर गुरुच्याप्रती कृतज्ञता म्हणून महेंद्र पवार व इतर विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे दिली. विदयार्थ्यांकडून शिक्षकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. प्रा. सिमा पाटील यांनी गुरु चे मानवी जीवनात देवापेक्षा श्रेष्ठ स्थान कसे असते हे सुंदर कथे द्वारे सांगितले. यानंतर कार्यकमाच्या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा . डी.बी .पाटील यांनी गुरुपौर्णिमेच्या महत्व सांगत आदयगुरु आईवडिलांच्या चरणी नतमस्तक व्हावे, कारण आई च्या चरणी साक्षात 33कोटी देवांचे वास्तव्य असते. तसेच गुरूंचा आदर व त्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा आदर सर्वच विद्यार्थ्यांर्नी केला पाहिजे हीच तुमची खरी गुरुदक्षिणा असेल असे सांगितले. तसेच विशेष अतिथीच्या भाषणात उमेश रहाणे, विजय पाटील, विजय देसले यांनी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
कु स्नेहा पवार हिने केले तर आभार प्रदर्शन कु. रितू बोरसे हिने केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित उच्च माध्यमिक विदयालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
