नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

On

नंदुरबार - नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ व जिल्हा युवा उन्नती मंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हास्तरीय मराठा समाज गुणगौरव व सत्कार समारंभ 2026" मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन लिंबाई भवन, गुरुकुल नगर, नंदुरबार येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व अध्यक्ष, नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज उन्नती मंडळ मा. श्री. पांडुरंग महादू मराठे होते. या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये *श्री. अरुण शांतिलाल साळुंखे, रा. नंदुरबार* यांचा विशेष गौरव सन्मानाने करण्यात आला. त्यांच्या समाजसेवा आणि कार्याबद्दल त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. किरण सुपडू काळे, संचालक, ईटल इंटरनॅशनल कॉर्पोरेशन, बेंगळुरू तसेच मा. डॉ. श्री. महेश धर्माजी बोरसे, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, ग्रीन ओझ केअर अँड पॉलिमर्स प्रा.लि. कल्याण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रा. श्री. पांडुरंग हंचनराव गायकवाड, अध्यक्ष, रुरल एज्युकेशन सोसायटी, दाताळी, मा. श्री. विकास बाबासाहेब गुंजाळ, पोलीस उपनिरिक्षक आणि मा. याबूबा हिरामण मराठे, संचालक, अखिल भारतीय सुर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अनिल वासुदेव वायकर, जिल्हा सचिव, डॉ. प्रा. श्री. संजय माधवराव उगले, जिल्हा सहसचिव, श्री. शांतिलाल पाडू गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष, श्री. भुषण जगन्नाथ चव्हाण, जिल्हा युवाध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि कर्मचारी सत्कार केल्यामुळे संपूर्ण मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे.

IMG-20260802-WA0039

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
02 Aug 2026 By sandeep patil

नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

IMG-20260802-WA0039

https://www.maharashtrasarthi.com/appreciation-and-felicitation-ceremony-by-nandurbar-and-dhule-districts-maratha-community/article-93

खबरें और भी हैं

मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

ताजा बातम्या

LIVEमुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

मुंबई - महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी...
मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’

अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील सरपंच सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांच्या गावविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल...
निंभोऱ्याच्या विकासाची दखल! सौ. कुमुदिनी विनोद पाटील यांना ‘आदर्श सरपंच पुरस्कार’

नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

नंदुरबार - नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळ व जिल्हा युवा उन्नती मंडळ, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने...
नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाजातर्फे गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न*

री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित उच्च माध्यमिक विदयालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पारोळा - येथील उच्च माध्यमिक विद्यालयात आज (ता.29) रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम  उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन...
री धनदाई माता बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित उच्च माध्यमिक विदयालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved
Powered By Vedanta Software