दहशतवादाला प्रोत्साहन देणारी ११४ डिजिटल प्रकाशनं प्रतिबंधित....

राज्य सरकारची अधिसूचना जारी

On

मुंबई प्रतिनिधी -

दहशतवादाला प्रोत्साहन देणारे लेख, पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ आणि डिजिटल दस्तऐवज प्रसारित होत असल्याचं महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर, अशा राष्ट्रविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारनं अधिसूचना जारी करून दहशतवादाला प्रोत्साहन देणारी ११४ पीडीएफ नियतकालिकं आणि डिजिटल दस्तऐवज प्रतिबंधित केले आहेत. या अधिसूचनेनुसार अशा साहित्याचा प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वरूपात ताबा ठेवणं, साठवणूक करणं, प्रसार, वितरण, विक्री किंवा प्रदर्शन करणं यावर बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी अशा प्रकारचं साहित्य स्वतःजवळ बाळगू नये किंवा त्याचा प्रसार करू नये. अशा प्रकारचं साहित्य आढळल्यास संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी आणि माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

या अधिसूचनेतील ११४ प्रकाशनं आणि दस्तऐवजांच्या यादीत‘व्हॉइस ऑफ खुरासान मॅगझिन’, ‘द रिव्होल्यूशनरी रिसर्जन्स’, ‘काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज’, ‘द सोल ऑफ रेझिस्टन्स’ आणि ‘नवाई गझवा-ए-हिंद’ यांसारख्या शीर्षकांचा समावेश आहे. या प्रकाशनांचा संबंध विविध प्रतिबंधित दहशतवादी संघटनांशी असल्याचं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

राष्ट्रीय एकता आणि सुरक्षेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या प्रचाराला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
07 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/mumbai/banned-114-digital-publications-promoting-terrorism/article-104

खबरें और भी हैं

दहशतवादाला प्रोत्साहन देणारी ११४ डिजिटल प्रकाशनं प्रतिबंधित....

ताजा बातम्या

दहशतवादाला प्रोत्साहन देणारी ११४ डिजिटल प्रकाशनं प्रतिबंधित....

मुंबई प्रतिनिधी - दहशतवादाला प्रोत्साहन देणारे लेख, पोस्ट, ऑडिओ, व्हिडिओ आणि डिजिटल दस्तऐवज प्रसारित होत असल्याचं महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या निदर्शनास...
मुंबई 
दहशतवादाला प्रोत्साहन देणारी ११४ डिजिटल प्रकाशनं प्रतिबंधित....

नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात दुपारी सुमारे ३ वाजून ४० मिनिटांनी, तर कळवण तालुक्यातील दळवट परिसरात ३ वाजून ३८ मिनिटांनी भूकंपाचा...
राज्य 
नाशिक जिल्ह्यात आज दुपारी कळवण, पेठ आणि सुरगाणा तालुक्यांतील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के....

ज्ञानदेव संगीत महोत्सवाचे आयोजन

अभिनवगंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर संगीत कला अकादमी, पुणे आयोजित आणि उर्मी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘ज्ञानदेव संगीत महोत्सव २०२६’ येत्या रविवार,...
राज्य 
ज्ञानदेव संगीत  महोत्सवाचे आयोजन

LIVEमुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत

मुंबई - महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि सावंतवाडी...
मुंबई–सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस रेल्वे सेवेला मंजुरी; महाराष्ट्र आणि कोकणातील रेल्वे संपर्क होणार अधिक मजबूत
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved