- Hindi News
- जळगाव
- नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना
सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ
सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मुखेड शिवारात गवळण नदी पात्रात घडली मृत वृद्धाचे शव पाण्यावर तरंगून आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला सोयगाव पोलीस ठाण्यात रात्री नऊ वाजता आकास्मित मृत्यूची नोंद केली आहे
बनोटी येथील बाबुलाल श्यामा सोनवणे( वय 55) हे मुखेड शिवारात गवळण नदीच्या पात्रात मासे पकडण्या साठी गेले त्यांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात तोल घसरून मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी वर्तविला आहे दरम्यान नदीच्या पात्रात खोल पाणी होते त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाल्यावर काही वेळात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगून आढळून आल्याचे काही ग्रामस्थ्यांच्या निदर्शनास आले मुखेडचे पोलीस पाटील अर्जुन कोतकर यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या सह पोलीस पथकाने धाव घेऊन मृतदेह बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येत वैद्यकीय अधिकारी मोनम ढवळे यांनी मृत घोषित करून शवविच्छेदन करून रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस निरीक्षक दिनकर गोरे, उपनिरीक्षक गजानन आरेकर राजू बर्डे, गजानन दांडगे, संदीप सुसर, संजय सिंगल, अजय कोळी, सादिक तडवी, आदिनी ही कारवाई केली आहे.