सावखेडा जिल्हा परिषद शाळा सावखेडा बुद्रूक ग्रामपंचायत, ग्रा.पं.सावखेडा खुर्द येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा

On

सावखेडा तालुका रावेर:- दि.९रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सावखेडा परिसरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त क्रांतिकारी ख्वाजा नाईक, क्रांतिकारी तंट्या भिल,क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावखेडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत तसेच सावखेडा बुद्रुक आणि सावखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सावखेडा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृती, परंपरा, चालीरीती आणि इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक नृत्य, कार्यक्रम सादर करण्यात आले. दरम्यान, सावखेडा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनेही जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आदिवासी समाजाच्या हक्कांविषयी, परंपरांविषयी तसेच समाजाच्या विकासासाठी एकजुटीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सावखेडा खुर्द ग्रामपंचायतीतही आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात आदिवासी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करून समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, एकता आणि सामाजिक बांधिलकीची गरज व्यक्त करण्यात आली. या तिन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांमुळे सावखेडा परिसरात आदिवासी दिनाचा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. याप्रसंगी सावखेडा बुद्रुक सरपंच युवराज कराड, सावखेडा खुर्द सरपंचरविंद्र महाजन, सावखेडा बुद्रुक पोलीस पाटील गणेश पाटील, सावखेडा खुर्द पोलीस पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, समाजसेवक विजय नहाले, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

Edited By: sandeep patil
www.yourdomain.com
09 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/draft-add-your-title-sawkheda-zilla-parishad-school-sawkheda-budruk/article-112

खबरें और भी हैं

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

ताजा बातम्या

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

मुंबई - राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप...
मुंबई 
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार...
जळगाव 
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved