- Hindi News
- जळगाव
- सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात धाडसी चोरी.
सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात धाडसी चोरी.
देविंचे चांदीचे मुकुट व छत्र्या लंपास, १ लाख ३५ हजारांचा ऐवज गायब.
दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा
चोपडा |प्रतिनिधी : यशवंत जडे.
चोपडा व यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या प्रसिद्ध श्री मनुदेवी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. मनुदेवी माता व रेणुकामाता यांच्या मंदिरातील मूर्तीवरील चांदीचे मुकुट व छत्र्या चोरट्यांनी लंपास केल्या. चोरी झालेल्या ऐवजाची अंदाजे किंमत १ लाख ३५ हजार रुपये असल्याची माहिती आहे.
मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष शिवाजी प्रभाकर पाटील यांनी यावल पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी मंदिरातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनी मंदिराचा गाभारा व मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर उघडण्यासाठी गेले असता मुख्य दरवाजाचे तसेच गाभाऱ्याचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले.
मंदिरात पाहणी केली असता मनुदेवी माता व रेणुकामाता यांच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट व छत्र्या गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरी गेलेल्या ऐवजामध्ये मनुदेवी मातेचा सुमारे ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट, २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री, रेणुकामातेचा ३०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि २०० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री यांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मनुदेवी मंदिरात दर्शनासाठी खान्देशासह विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात सीसीटीव्ही व प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.
तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणीही या निमित्ताने पुढे आली आहे.