आडगाव येथे कासोदा पोलीस स्टेशनतर्फे ' शाळा जनजागृती अभियान ', विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..........!*

On

एरंडोल (प्रतिनिधी)

बदलत्या डिजिटल युगात युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणे आणि कायदा-सुव्यवस्थेविषयी समाजात जागरूकता निर्माण होणे काळाची गरज बनली आहे. याच ध्येयाने कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने ७ ऑगस्ट २०२६ रोजी आडगाव ता. एरंडोल येथील धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालयात विशेष शाळा जनजागृती व समाजप्रबोधन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते पार पडले, तर मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील (चिलाणेकर) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

        याप्रसंगी पाच महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले.

१) सायबर क्राईम: ऑनलाइन डिजिटल फसवणूक टाळणे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा.

२) गुड टच - बॅड टच या संवेदनशील विषयावर लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्वसंरक्षण आणि जागरूकतेचे धडे देण्यात आले.

३) वाहतूक सुरक्षा संदर्भात रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन कसे करावे.

४) महिला सुरक्षेबाबतचे कायदे आणि आपत्कालीन परिस्थितीतील मदतीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

५) व्यसनमुक्ती जनजागृती संदर्भात व्यसनाधीनतेचे घातक दुष्परिणाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

            कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी दैनंदिन जीवनातील सोपी उदाहरणे व प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. " बालकांवर व वयात येणाऱ्या मुलांवर आज योग्य संस्कार झाले, तरच भविष्यात सुजाण व जबाबदार नागरिक घडतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच निलेश गजरे यांनी आपल्या रंजक शैलीत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले.

            आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रमोद पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम भावी पिढी घडवणारा असल्याचे सांगितले.

          या वेळी सहाय्यक फौजदार नितीन सूर्यवंशी, नितीन पाटील, पोलीस कर्मचारी मुजावर, मनोज पाटील, पोलीस पाटील नितीन भुसारी व प्रकाश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिलाष महालपुरे यांनी केले, तर आभार विनोद सपकाळे यांनी मानले. या अभियानाला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला.IMG-20260809-WA0041

Edited By: Shailendra Thakur
www.yourdomain.com
09 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/spontaneous-response-of-school-awareness-campaign-by-students-and-villagers/article-113

खबरें और भी हैं

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

ताजा बातम्या

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

मुंबई - राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप...
मुंबई 
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार...
जळगाव 
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved