जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते रामदास पावरा यांना नियुक्तीपत्र प्रदान व सत्कार.

On

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा

चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे

     अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी चोपडा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास भाईदास पावरा यांची अधिकृत निवड झाली आहे. जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त रविवारी (९ ऑगस्ट) नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे आयोजित भव्य सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या हस्ते रामदास पावरा यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

     आदिवासी कार्यकर्ते रामदास पावरा यांचे सामाजिक कार्य व समाजाबद्दलची तळमळ लक्षात घेऊन, परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजि. गणेशभाऊ गवळी यांनी सहमतीने ही निवड केली.

हजारो आदिवासी बांधवांची उपस्थिती*

नाशिक येथील ऐतिहासिक गोल्फ क्लब मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी तसेच पारंपरिक पेहरावात हजारो आदिवासी बांधव, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेबाबत पार्श्वभूमी

देशातील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार व आदिवासी नेत्यांनी स्थापन केलेली ही राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संघटना आहे.

     सामान्य आदिवासी जनतेच्या न्यायहक्कांसाठी ही परिषद संपूर्ण भारतभर प्रामाणिकपणे व आक्रमक लढा देते.

     IMG-20260809-WA0069या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी "परिषदेने सोपवलेली ही जबाबदारी स्वीकारून तळागाळातील तरुण-तरुणींच्या प्रश्नांसाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी मी कटिबद्ध राहीन," अशी प्रतिक्रिया नियुक्तीनंतर नवनियुक्त प्रदेश युवा उपाध्यक्ष रामदास पावरा यांनी दिली.

Edited By: Shailendra Thakur
www.yourdomain.com
09 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/on-world-tribal-day-ramdas-pavara-was-elected-as-the/article-124

खबरें और भी हैं

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

ताजा बातम्या

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

सोयगाव प्रतिनिधी- ज्ञानेश्वर वाघ सोयगाव,दि. 9 मासे पकडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय वृद्धाचा पाय घसरून पाण्यात बुडाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चार...
जळगाव 
नदी पात्रात बुडून एकाचा मृत्यू :- मुखेड शिवरातील घटना.

वाकडी जि.प. शाळेत १५ ऑगस्टची 'संगीत कवायत' पूर्वतयारी; दर्जेदार शिक्षणामुळे नागरिकांकडून कौतुक

सोयगाव प्रतिनिधी सोयगाव आगामी स्वातंत्र्यदिनानिमित्त (१५ ऑगस्ट) विद्यार्थ्यांचा संगीत कवायत सराव.    सोयगाव प्रतिनिधी -ज्ञानेश्वर वाघ सोयगाव तालुक्यातील वाकडी येथील जिल्हा...
जळगाव  मनोरंजन  क्रीडा 
वाकडी जि.प. शाळेत १५ ऑगस्टची 'संगीत कवायत' पूर्वतयारी; दर्जेदार शिक्षणामुळे नागरिकांकडून कौतुक
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved