- Hindi News
- जळगाव
- रेल्वे पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिहार राज्यातील तरुणाला माणुसकी वृद्ध आश्रमाने दिला सहारा...
रेल्वे पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिहार राज्यातील तरुणाला माणुसकी वृद्ध आश्रमाने दिला सहारा.
रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत सापडलेल्या तरुणाचे नातेवाईक शोधण्यास रेल्वे पोलिसांना यश, पतीला बघताच पत्नीचे अश्रू अनावर...
रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन, संभाजीनगर येथे दि. ०६/०५/२०२६ रोजी एक इसम बेवारस अवस्थेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर आर.पी.एफ. पोलीस अधिकारी राकेश शर्मा यांना आढळून आल्याने त्यास पोलिसांनी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. राकेश शर्मा यांनी सदर इसमास रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन, संभाजीनगर येथे हजर करून कळविले असता,श्रीमती विरयानी कदम मॅडम,पोलीस निरीक्षक, रेल्वे यांनी सदर इसमाची विचारपूस केली.त्याने आपले नाव, गाव, पत्ता दुमाहाथा, थाना, जिल्हा-गोपालगंज (बिहार) असे सांगितले असता चंद्रवीजय प्रधान सहाय्यक फौजदार यांनी त्यास तात्पुरत्या निवाऱ्याकरीता मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या सु-लक्षी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित माणुसकी वृद्ध सेवालयाचे सुमित पंडित यांच्याशी पोलिसांनी फोनद्वारे संपर्क साधून सदर इसमाची माहिती दिली असता, सुमित यांनी कागदोपत्री पूर्तता करून पोलिसांच्या मदतीने त्यास प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी सांगितले की तो मानसिक डिप्रेशनमध्ये आहे. त्याला नीट उभेही राहता येत नाही, बोलताही येत नाही. त्यास प्रथमोपचार करून माणुसकी वृद्ध आश्रम येथे दाखल करण्यात आले होते. त्यास माणुसकी समूहाच्या टीमने विश्वासात घेऊन सदर इसमाची विचारपूस करता त्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक सांगितला असता, सदर मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता त्यांची पत्नी सबिहा साकीब अली यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी कळविले की त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे. ते दहा दिवसांपासून मिसिंग आहेत. त्यांना आम्ही खूप शोधले, ते कुठेही सापडत नसल्याचे सांगत, त्यांना आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यासाठी येत आहोत. तोपर्यंत त्यांना सांभाळा, असे पत्नीने सांगितले.
व सदर नातेवाईक माणुसकी वृद्ध सेवालय येथे दोन दिवसांनंतर आले. त्यांच्या पेशंटची खात्री करून कागदोपत्री पुरावे बघितले असता खात्री झाल्याने त्यास माणुसकी समूहाच्या टीमने रेल्वे पोलीस स्टेशन येथे पोलिसांच्या समक्ष हजर करून सदर इसमास नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यात संदीप पालवे साहेब, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग संभाजीनगर,इशामोद्दीन पठाण साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली विरयानी कदम मॅडम पोलीस निरीक्षक रेल्वे, प्रीती फड मॅडम सहाय्यक पोलीस निरीक्षक रेल्वे, अनिता बागुल पोलीस उपनिरीक्षक रेल्वे पोलीस स्टेशन कर्मचारी चंद्रविजय प्रधान साय्यक फौजदार,संजय राऊत,सतीश घोडके,दिगंबर राठोड,राकेश शर्मा,आर.पी.एफ.रेल्वे पोलीस, संभाजीनगर पोलीस स्टेशन व माणुसकी समूहाचे सुमित पंडित, प्रा. शरद सोनवणे, विजय निंबाळकर, माणुसकी वृद्ध आश्रमाच्या संचालिका पूजा पंडित आदींनी मदतकार्य केले.
आपल्या पतीला बघताच पत्नीचे अश्रू अनावर; पत्नी साहिबाने सांगितली आपबीती
माझे लग्न होऊन ८ महिने झाले. घरात सासू, सासरे, नणंद व माझे पती घरामध्ये कमावणारे एकटेच आहेत. कामासाठी ते सौदी अरेबियात गेले होते. त्यांच्या कामावर आमचे कुटुंब चालते. ते काही कामानिमित्त मुंबईला गेले होते. तेथेच मित्रासोबत काही दिवस मुंबईत होते. त्यांनी फोन करून सांगितले की, मी गावी येतोय. मी सध्या मुंबई विमानतळावर आहे. माझे तिकीट बुक करून द्या, असे सांगितले असता आम्ही तिकीट बुक केले; परंतु ते विमानतळावर आलेच नाहीत. त्यांचा फोनही बंद झाला. त्यांच्याकडील मोबाईल, बॅग, रोख रक्कमही चोरीला गेल्याचे त्यांनी दोन दिवसांनी दुसऱ्याच्या फोनवरून झाशी रेल्वे स्थानकावरून आम्हाला सांगितले. आम्ही झाशी रेल्वे स्टेशन येथे खूप शोधले; परंतु ते आम्हाला सापडले नाहीत. तुम्ही आमच्या पतीला सहारा दिला, सांभाळले. तुमच्यामुळे ते आम्हाला परत मिळाले. तुमचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही, असे पत्नी साकीबा यांनी सांगितले.
पोलिसांनी दाखवली माणुसकी एक सामाजिक दायित्व म्हणून मदत केली.
एखाद्या अधिकाऱ्याकडे तपास नसला, तरी त्याने जर लक्ष देऊन काम केले तर नक्कीच ते काम पूर्णत्वास येते, असेच प्रत्यक्षदर्शी उदाहरण म्हणजे विरयानी कदम मॅडम, पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस स्टेशन, संभाजीनगर. बिहार राज्यातील पोलिसांना संपूर्ण साधून पत्नीचा संपर्क मिळाल्याने तिच्याशी फोनद्वारे संपर्क साधून तुझे पती सध्या माणुसकी वृद्ध सेवालय येथे पोलिसांनी दाखल केल्याचे सांगितले असता, तात्काळ आपल्या नातेवाईकांना कळवून पतीला घेण्यासाठी माणुसकी वृद्ध सेवालयात धाव घेतली व ओळख पटवून आपल्या पतीला घेऊन गेले.एक सामाजिक दायित्व म्हणून मदत केली. सुमित पंडित यांचे काम खूप मोलाचे आहे. पोलिसांना जेव्हा जेव्हाही बेवारस अवस्थेत सापडलेले मनोरुग्ण, वृद्ध सापडतात, तेव्हा अर्ध्या रात्री ते पोलिसांच्या मदतीला धावून येतात. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ५२ जणांचे नातेवाईक शोधून सुरक्षितपणे त्यांच्या घरी पाठवले आहे.
विरयानी कदम -पोलीस निरीक्षक, रेल्वे पोलीस स्टेशन, संभाजीनगर