माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....

केवळ २० ई-रिक्षांमुळे प्रवाशांची गैरसोय, तासनतास रांगा

sandeep patil Picture
On

रायगड प्रतिनिधी -

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी वातावरण आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दररोज सुमारे १० ते १२ हजार पर्यटक माथेरानमध्ये दाखल होत असल्यामुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे.

मात्र, पर्यटकांची वाढती संख्या आणि उपलब्ध वाहतूक व्यवस्था यामध्ये मोठी तफावत असल्यामुळे पर्यटकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दस्तुरी नाका इथं ई-रिक्षा मिळवण्यासाठी पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं चित्र आहे.

माथेरानमध्ये इतर वाहनांना प्रवेशबंदी असल्यामुळे दस्तुरी नाका ते मुख्य बाजारपेठेपर्यंतचा प्रवास पर्यटकांना पायी, घोड्यावरून किंवा ई-रिक्षानं करावा लागतो. पर्यावरणपूरक ई-रिक्षांची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, सध्या दररोज दाखल होणाऱ्या हजारो पर्यटकांच्या तुलनेत या मार्गावर केवळ २० ई-रिक्षा धावत असल्यामुळे ही व्यवस्था अपुरी ठरत आहे.

ई-रिक्षांची संख्या मर्यादित असल्यामुळे पर्यटकांना रिक्षेसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आठवड्याच्या अखेरीस आणि सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढल्यानं परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात माथेरानच्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर व्हावा आणि ज्येष्ठ नागरिकांसह महिला आणि लहान मुलांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनानं ई-रिक्षांची संख्या तातडीनं वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून करण्यात येत आहे.

माथेरानमधील वाढती पर्यटकसंख्या लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेचं योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By: sandeep patil
www.maharashtrasarthi.com
10 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/state/tourists-flock-to-matheran-for-monsoon-tourism/article-134

खबरें और भी हैं

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

ताजा बातम्या

श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

पुणे -   श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील भाविकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात येत्या १३ ऑगस्टपासून भीमाशंकर मंदिर सकाळी...
राज्य 
श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १३ ऑगस्टपासून रात्री साडेनऊपर्यंत खुलं राहणार..

'डीआरआय’ ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त..

मुंबई प्रतिनिधी - मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवत, महसूल गुप्तचर...
राष्ट्रीय 
'डीआरआय’ ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त..

माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....

रायगड प्रतिनिधी - रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये पावसाळी वातावरण आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची...
राज्य 
माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी....

रेल्वे पोलिसांना बेवारस अवस्थेत सापडलेल्या बिहार राज्यातील तरुणाला माणुसकी वृद्ध आश्रमाने दिला सहारा.

   रेल्वे लोहमार्ग पोलीस स्टेशन, संभाजीनगर येथे दि. ०६/०५/२०२६ रोजी एक इसम बेवारस अवस्थेत रेल्वे प्लॅटफॉर्मवर आर.पी.एफ. पोलीस अधिकारी राकेश शर्मा...
जळगाव 