" मुलं यशस्वी झाली.... पण नातं कुठे हरवलं "

On

जळगाव प्रतिनिधी 

सध्या दोन बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यातील पहिली बातमी एका बापाची चिता जळत होती आणि शेकडो किलोमीटर दूर बसलेल्या त्यांच्या तिन्ही मुली हे सगळं व्हिडिओ कॉलवर बघत होत्या व अजून किती वेळ लागेल ? आम्हाला अंघोळ करायची आहे? जेवण करायचे आहे ? हे त्या मुलींचे शब्द आहेत. काळीज चिरून टाकणारी ही घटना घडली आहे हरियाणातील सोनीपत मध्ये. शिवचरण गुप्ता मुळचे मुंबईचे व्यापारी पोट मारून तिन्ही मुलींना शिकवले, उच्च शिक्षित केले, लहानाचे मोठे केले, दोन लेकींना शिक्षिका बनवले त्यांचे संसार उभे केले पण आयुष्याची शेवटची दोन वर्ष त्यांना वृद्धाश्रमात एकाकी काढावी लागली . गेल्या 20 दिवसापासून हा बाप अंथरुणाला खिळून होता. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांनी मुलींना वारंवार फोन करून सांगितले की तुमच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे .तुम्ही येऊन भेटून जा, पण एकही लेकीला वेळ मिळाला नाही .शेवटी बापाने श्वास सोडला ,जग सोडलं तेव्हाही एकही लेक आली नाही .मग अंत्यसंस्कार कसे झाले ? व्हिडिओ कॉलवर तिन्ही मुली मोबाईलच्या स्क्रीनवर बापाची चिता जळताना पाहत होत्या. एका मुलीने फक्त 5100 रुपये ऑनलाईन पाठवले आणि फोनवर सांगितले की अंत्यसंस्कार व्यवस्थित करून राख गंगेत टाकून द्या एवढा मेसेज टाकून विषय संपला. यामागे काय कारण होती. त्यांच्या कौटुंबिक नात्याचा इतिहास काय होता हे आपल्याला पूर्णपणे माहिती नाही.पण ज्या बापाने शिक्षण, करियर दिले . पण संस्कार कुठे गेले? पैशांनी कुणीही जगातील व्यक्ती आपल्या आई बापाचे ऋण कोणत्याही क्युआरकोडने फेडू शकत नाही .

    दुसरी बातमी आपल्या अभिनयाच्या वेगळ्या ठसा असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची जीवनकाहणी आता समोर आली आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील एक अत्यंत भावूक आणि कटू सत्यावर प्रकाश टाकला आहे. रोखठोक आणि खणखणीत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या उषाताई गेल्या 40 वर्षापासून घरात पूर्णपणे एकट्या राहत आहेत. त्यांनी आपल्या एकटेपणावर आणि मृत्यूवर केलेल्या विधानामुळे सिनेसृष्टीतील कलाकार आणि चहाते सुन्न झाले आहेत .गेल्या 40 वर्षांपासून घरात एकट्याच राहतात. त्यांचे वय 80 वर्ष आहे .कधी कधी त्यांच्या मनात विचार येतो की, जर मी बंद घरात झोपेतच एकटी मेली तर कोणाला कळणार सुद्धा नाही. कदाचित दुसऱ्या दिवशी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना आपला मृत्यू झाल्याचे समजेल अशी विदारक आणि मन खिन्न करणारी भावना त्यांनी व्यक्त केली आहे .लग्नानंतर काही वर्षातच त्यांचे पतीसोबत मतभेद सुरू झाले आणि त्या विभक्त राहू लागल्या .त्यांच्या या दुःखातील सर्वात मोठी सल म्हणजे त्यांचा स्वतःचा मुलगा हा आज त्यांच्या सोबत राहत नाही. तो त्यांना आपली आई मानण्यासही तयार नाही. मुलगा म्हणतो 'तू फक्त जन्म दिलाय ' माझी खरी आई तर माझी आजी होती .त्या मागील कारणही त्यांनी प्रामाणिक मान्य केले. तरुणपणात नाटक, दूरचित्रवाणी, शूटिंगमुळे मुलाला हवा तसा वेळ देता आला नाही. त्याच्या सर्व सांभाळ आजीने केला. अथांग संघर्षाने भरलेले आयुष्य पण वैयक्तिक आयुष्यात एकटेपणा आहे .या एकटेपणाची पूर्ण सवय त्यांना झाली आहे. त्यांना आज मृत्यूची भीती वाटत नाही .

   मुलं यशस्वी झाली पण नातं कुठे हरवलं ?आई-वडिलांची अखेरच्या क्षणी किंवा अंत्यविधीलाही उपस्थित राहत नाही ही घटना केवळ दुःखद नाही तर आधुनिक पालकांसमोर अनेक प्रश्न उभी करणारी आहे .आपण मुलांच्या शिक्षणासाठी, करिअरसाठी आणि आर्थिक भविष्यासाठी आयुष्यभर धावतो पण संवेदना ,कृतज्ञता, नाती जपणं आणि माणसांसाठी वेळ काढणं शिकवतो का? पालक म्हणून आपण मुलांना फक्त सुविधा देत आहोत पण विश्वास, प्रेम निर्माण करत आहोत का? कारण मुलांचे भविष्य घडवतांना त्यांच्यासोबतचं नातं हरवू देऊ नका. शिक्षणाने मुलं यशस्वी होतील पण संस्कारांनी ? मुलं मोठी होतात, यशस्वी होतात पण नातं मोठं होतंय का ? आयुष्याच्या शेवटी आजारपणात आपल्याला गरज असते ती आपल्या माणसांचा वेळ , प्रेम आणि स्पर्श यांची . पण हे साध गणित आजच्या पिढीला कळत नाही. तरुणपणी आपण ज्यांच्यासाठी संघर्ष करतो ती मुलं- मुली म्हणजे आपली म्हातारपणाची हक्काची सोय हा विचार सोडून द्यायला हवा का?

IMG-20260810-WA0050

Edited By: Shailendra Thakur
www.yourdomain.com
10 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/the-children-succeeded-but-where-the-relationship-was-lost/article-127

खबरें और भी हैं

" मुलं यशस्वी झाली.... पण नातं कुठे हरवलं "

ताजा बातम्या

" मुलं यशस्वी झाली.... पण नातं कुठे हरवलं "

जळगाव प्रतिनिधी  सध्या दोन बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यातील पहिली बातमी एका बापाची चिता जळत होती आणि...
जळगाव 
" मुलं यशस्वी झाली.... पण नातं कुठे हरवलं "

१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

मुंबई - राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, १५ ऑगस्टपासून जुजबी मराठीही बोलता येत नसल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा, परिवहन मंत्री प्रताप...
मुंबई 
१५ ऑगस्टपासून मराठी न आल्यास कारवाई..

चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व क्रांतिदिन साजरा.

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा   चोपडा प्रतिनिधी :-यशवंत जडे   चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम...
जळगाव 
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघात जागातिक आदिवासी व  क्रांतिदिन साजरा.

जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*

दै. महाराष्ट्र सारथी वृत्तसेवा चोपडा प्रतिनिधी :- यशवंत जडे           अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली' च्या महाराष्ट्र प्रदेश       हजारो...
जळगाव 
जागतिक आदिवासी दिनी रामदास पावरा यांची 'अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद' च्या प्रदेश युवा उपाध्यक्ष पदी निवड*
Copyright (c) Maharashtra Sarthi - All Rights Reserved