- Hindi News
- राज्य
- पनवेल, माणगावात मनसे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर राज ठाकरे यांची
पनवेल, माणगावात मनसे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवर राज ठाकरे यांची टीका..
रायगड -
रायगड जिल्ह्यातील १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रायगड दौरा केला. यावेळी त्यांच्या हस्ते पनवेल आणि माणगाव येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज ठाकरे यांनी स्थानिक नेते आणि राजकीय हस्तक्षेपावर टीका केली. राजकीय हस्तक्षेपामुळे महामार्गाचे काम रखडल्याचा आरोप त्यांनी केला. महामार्गाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण यापूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. कंत्राटदार कामातून माघार घेत असल्याचे गडकरी यांनी सांगितल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.
महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन वेळेत न झाल्याने अडचणी निर्माण झाल्या. कंत्राटे आणि त्यातील कथित टक्केवारीच्या राजकारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नव्याने बांधलेल्या रस्त्याच्या निकृष्ट अवस्थेवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
रायगडमध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकास आराखड्याचाही उल्लेख केला. या भागात एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, जागतिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठे उभारण्याच्या योजना असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विकास प्रक्रियेत स्थानिक तरुणांना संधी मिळणार आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विकासाला आपला विरोध नसून कोकणातील विकास नियोजनबद्ध आणि स्थानिकांच्या हिताचा असावा, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. स्थानिक नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींकडून विकासकामांबाबत जाब विचारावा आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींना मतपेटीतून धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.