'डीआरआय’ ने महाराष्ट्रात आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट केले उद्ध्वस्त..

अवैध मार्गाने नायजेरियाला पाठवल्या जाणाऱ्या गोळ्या जप्त; तीन मुख्य आरोपींना अटक

sandeep patil Picture
On

मुंबई प्रतिनिधी -

मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली सातत्यपूर्ण कारवाई सुरू ठेवत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) आफ्रिकन देशांमध्ये मनोव्याधीवरील सूचीबध्‍द औषधे- पदार्थ  असलेल्या ‘ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड’ गोळ्यांचे गुप्तपणे उत्पादन, लपवाछपवी आणि अवैध निर्यात करणाऱे एक संघटित नेटवर्क उद्ध्‍वस्त केले  केला. 

गुप्तचर माहितीवर आधारित या आठवडाभर चाललेल्या कारवाईत एक लाख ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड गोळ्या, एक लाख टॅपेंटाडोल गोळ्या तसेच मनोव्याधीवर उपयुक्त ठरणारी औषधे, त्यासाठी लागणारे  पदार्थ तसेच  गुप्त उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि कच्चा माल जप्त करण्यात आला असून या टोळीच्या तीन प्रमुख सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

दिनांक 02.08.26 रोजी मिळालेल्या  गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या एका कारवाईत डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई एअर कार्गो कॉम्प्लेक्स येथे नायजेरियाला जाणारा  निर्यात माल अडवला. या निर्यात मालामध्ये प्रेगाबालिन कॅप्सूल - 300 मिग्रॅ असल्याचे घोषित करण्यात आले होते. तथापि, सखोल तपासणीअंती या निर्यात मालामध्ये लपवून ठेवलेल्या 1 लाख ट्रॅमाडोल हायड्रोक्लोराईड 250 मिलीग्रॅमच्या गोळ्या (वजन अंदाजे 25 किलो) आणि 1 लाख टॅपेंटाडोल 200 मिग्रॅच्या गोळ्या (वजन अंदाजे 20 किलो) जप्त करण्यात आल्या.

डीआरआयने केलेल्या वेगवान तपासामुळे अनेक टप्प्यांवर चालणारी एक सुसंघटित पुरवठा साखळी उघडकीस आली. ट्रॅमाडोलच्या गोळ्या महाराष्ट्रातील अंबरनाथ येथील एका कारखान्यात गुप्तपणे तयार केल्या जात होत्या आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी साध्या पुठ्ठ्यांच्या खोक्यांमध्ये पॅक केल्या जात होत्या. त्यानंतर हा माल मुंबई एअर कार्गो कॉम्प्लेक्सजवळील एका गोदामात नेण्यात येत होता.या ठिकाणी तो पांढऱ्या गोण्यांमध्ये पुन्हा पॅक करून नायजेरियाला अवैध निर्यात करण्‍यासाठी सज्ज केला जात होता.

आठवडाभर चाललेल्या समन्वित पाठपुरावा मोहिमांच्या मालिकेत डीआरआय अधिकाऱ्यांनी निर्यातदार, उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार आणि साठवणुकीच्या गोदामाशी संबंधित अशा अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली. उत्पादन सुविधेवरील शोधमोहिमेत मादक पदार्थांच्या बेकायदेशीर उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या टॅब्लेट कॉम्प्रेशन मशिनरीसह मोठ्या प्रमाणावर कच्चा माल जप्त करण्यात आला.

या कारवाईच्या अखेरीस आयईसी धारक/निर्यातदार, पुरवठादार-सह-समन्वयक आणि ट्रॅमाडोल गोळ्यांचा गुप्त उत्पादक यांचा समावेश असलेल्या तीन प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

ताजा बातम्या

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

मंठा  प्रतिनिधी - सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
राज्य 
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी ) मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
जळगाव 
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कजगाव प्रतिनिधी - कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध...
जळगाव 
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

नासिक प्रतिनिधी - येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन ...
राज्य 
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न