नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

sandeep patil Picture
On

नासिक प्रतिनिधी -

येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन स्वच्छता ही सेवा अभियान -२०२६ संपन्न झाले.
यावेळी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी आणि जिल्हा आयकॉन मदन रामनाथ लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नासिक रोड रेल्वे स्टेशनचे मॅनेजर सुरवाडे ,स्वास्थ निरीक्षक एस.एन.वर्मा राधेश्याम शहारे, संदेश कुंडलके ,उपस्टेशन प्रबंधक अश्विनी हॅरी, सुपरवाईझर कांता मिश्रा , RPF स्टाफ, तिकीट निरीक्षक तथा सफाई कर्मचारी उपस्थित होते
याप्रसंगी या अभियानाची सुरुवात स्वच्छता विषयक रॅलीने झाली या रॅलीमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आणि प्रवासी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, स्वच्छ भारत स्वस्थ भारत या घोषणाने प्लॅटफॉर्म नंबर एक वरून सुरुवात झाली रेल्वे तिकीट बुकिंग ऑफिसच्या बाहेर आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर रॅली निघाली.
या विविध प्रवाशांनी आप आपले रेल्वे स्वच्छते संबंधी अभिप्राय नोंदविले. त्याबरोबर त्यांनी नासिक रोड रेल्वे स्थानक चे कर्मचारी रेल्वे स्थानक स्वच्छ करीत असून सोबत जर प्रवाशांनी त्यात आपापल्या परीने सहभाग नोंदवला म्हणजे कचरा इतरत्र  न फेकता रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी असलेल्या वर्गीकरण केलेल्या डस्टबिनमध्येच टाकावे. पाण्याचा अपव्य टाळावा. भारतीय रेल ही आपली संपत्ती आहे असे समजून तिचा वापर करावा आणि वेळोवेळी प्रवाशांनी  आपले नासिक रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. 

याप्रसंगी मदन लाठी यांनी नाटिकेद्वारे ओला कचरा म्हणजे केळीचे सालटे, शिळे अन्न हिरव्या डस्टबिन मध्ये, आणि बिस्कीटचे रॅपर ,चिप्सचे रॅपर, सुक्या पाण्याच्या बाटल्या निळ्या डस्टबिनमध्ये सुका कचरा टाकावा, इतरत्र टाकू नाही. प्रवासात सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचा प्रयत्न करावा त्याऐवजी कापडी पिशवी चा वापर करण्याची विनंती केली, पाण्याची काटकसरीने वापर करून रेन हार्वेस्टिंग (कॅच द रेन) या संकल्पनेची माहिती दिली

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

ताजा बातम्या

नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

नासिक प्रतिनिधी - येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन ...
राज्य 
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....

नाशिक - महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थान 'नंदनवन' येथे गणरायाचे मनोभावे दर्शन घेण्यात...
मुंबई 
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी गणरायाचे दर्शन....

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....

मुंबई प्रतिनिधी - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सोमवारी महाराष्ट्रभर लाडक्या गणरायाचे उत्साहात आगमन झाले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीनिमित्त घरगुती...
राज्य  मुंबई 
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात महाराष्ट्रात गणरायाचे आगमन....

‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त..

नवी दिल्ली - भारताच्या पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक...
अंतरराष्ट्रीय  राष्ट्रीय  क्राईम 
‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त..