आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

Shailendra Thakur Picture
On

जळगाव प्रतिनिधी -गिरीष रमणलाल भावसार*

जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट 2026, गुरुवार रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

     कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांच्या मनगटावर राख्या बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व सांगणारी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेम, स्नेह, आपुलकी, बंधुभाव व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा संदेश देण्यात आला.

      या कार्यक्रमास विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. बी. पांढरे सर, गाईड शिक्षिका श्रीमती आर. जे. लांबोळे मॅडम,व सौ. एस. ए. साळी मॅडम,स्काऊट शिक्षक श्री. के. आर. वंजारी सर आदी शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत या सणामागील सामाजिक व भावनिक मूल्यांची माहिती दिली.   

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने विद्यालयात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.स्काऊट प्रमुख गिरीष रमणलाल भावसार यांनी प्रसिद्धीकरिता कळविले आहे.

IMG-20260825-WA0055

Edited By: Shailendra Thakur

खबरें और भी हैं

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

ताजा बातम्या

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

मंठा  प्रतिनिधी - सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
राज्य 
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी ) मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
जळगाव 
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कजगाव प्रतिनिधी - कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध...
जळगाव 
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न

नासिक प्रतिनिधी - येथील नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छ पखवाडा दिनांक १६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०३६ पर्यंत असुन ...
राज्य 
नासिक रोड रेल्वे स्टेशनवर स्वच्छता ही सेवा अभियान-२०२६ संपन्न