- Hindi News
- ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,
ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,
जळगावा शहरात अनोखा उपक्रम
बातमी वृत्त मनीषा पाटील यांच्याकडून
जळगाव प्रतिनिधी
शहरात कडक ऊन आणि पावसाची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था’ जळगावच्या वतीने आज अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत शहरातील विविध चौकांमध्ये duty बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांना राख्या बांधून त्यांच्या सुरक्षेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
या विशेष उपक्रमात नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांच्यासह आशा मौर्य, नेहा जगताप, दिपाली कुलकर्णी, मंगला खडके, पल्लवी सोनवणे वैशाली वाणी आदी महिला पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांनी स्वतः चौकात जाऊन पोलिसांच्या मनगटावर राखी बांधली आणि त्यांच्याप्रती सामाजिक बांधिलकी जोपासली. पोलिसांच्या चेहऱ्यावर या अनपेक्षित आणि स्नेहमय उपक्रमाने आनंद पाहायला मिळाला.
.jpg)
