- Hindi News
- जळगाव
- रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा -रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या कार्यक्रमात डी.जी. डॉ.राजे...
रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा -रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटच्या कार्यक्रमात डी.जी. डॉ.राजेश पाटील यांचे मार्गदर्शन .
जळगाव प्रतिनिधी-ज्ञानेश्वर वाघ
जळगाव - प्रत्येकाने रोटरीचे कार्य तन, मन, धन अर्पण करुन करावे. रोटरीच्या सेवाभावी कार्याचा उत्सव साजरा करा. रोटरीची चळवळ प्रत्येक घराघरात पोहचवून ती व्यापक करा, असे मार्गदर्शन रोटरीचे डिस्ट्रिक गव्हर्नर डॉ.राजेश पाटील यांनी केले. रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटला डॉ.राजेश पाटील यांनी ऑफिसियल क्लब व्हिजिट दिली. यानिमित्त मायादेवीनगरातील रोटरी भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी क्लबच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा परिचय डॉ.पंकज शहा यांनी करुन दिला. व्यासपीठावर क्लबचे अध्यक्ष संजय तापडिया, सचिव धर्मेंद्र भय्या, डॉ.पंकज शहा उपस्थित होते. संजय तापडिया यांनी क्लबच्या विविध कामकाजाची माहिती दिली. क्लबचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश सिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केले आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभार संदीप झवर यांनी मानले.
जळगावातील काम अभिमानास्पद
जळगावातील रोटरी क्लबचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद आहे. प्रत्येकाचे रोटरी चळवळीत मनापासून मोठे योगदान अपेक्षित आहे. या चळवळीत सर्व घटकातील क्रियाशील नवीन सदस्यांना जोडा आणि सेवेचा जास्तीत जास्त विस्तार करा. नावीन्यपूर्ण उपक्रमात अनेकांचा सहभाग वाढवा. त्यांच्यावर नवनवीन जबाबदारी सोपवा. सर्वांनी सर्व कामकाज एकजुटीने वेळेत व यशस्वीरित्या पूर्ण करा, असेही मार्गदर्शन डॉ.राजेश पाटील यांनी केले. 
