- Hindi News
- जळगाव
- कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न
महिला व गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उपक्रम; ३० पेक्षा अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कजगाव प्रतिनिधी -
कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त संकलनासाठी उपस्थित होते. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, यांनी उपस्थित राहून उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती मगर यांनी पत्रकार प्रणव शिंदे यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, रक्तदान शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले आहे. भविष्यातही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून अशाच प्रकारचे आरोग्यविषयक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती मगर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधानजी वाघ, आरोग्य सहाय्यक अधिकारी मराठे आण्णा, मेडिकल वितरण अधिकारी उमेश महाजन, सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भाऊ ललवाणी, ज्येष्ठ नागरिक अनिल टेलर महाजन, शिवसेना शहरप्रमुख दिनेश टेलर पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच पुंडलिक सोनवणे, पत्रकार प्रणव शिंदे,पत्रकार संजय महाज , रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आभार मानण्यात आले. “रक्तदान हेच जीवनदान” या संदेशातून नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
