सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

चाऱ्याचे मोठे नुकसान; शेती अवजारांचे शेडही आगीच्या भक्ष्यस्थानी..

sandeep patil Picture
On

कजगाव प्रतिनिधी -

सावदे, ता. भडगाव : येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र परदेशी यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या ज्वारीच्या चाऱ्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ४ हजार पेंढ्या आणि ५ एकर क्षेत्रातील जनावरांसाठी साठवलेला चारा जळून खाक झाला. तसेच चाऱ्याजवळ असलेले शेती अवजारे ठेवण्याचे शेडदेखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भीषण असल्यामुळे नागरिकांना त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र जनावरांसाठी मोठ्या मेहनतीने साठवून ठेवलेला चारा जळून गेल्याने शेतकऱ्यापुढे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महसूल अधिकारी गौरव पगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच शिवसेना विभागप्रमुख धनंजय भाऊ देसले यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.

सध्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा परिस्थितीत साठवून ठेवलेला चारा आगीत जळून गेल्याने परदेशी यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आगीचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता नसून, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

ताजा बातम्या

सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

कजगाव प्रतिनिधी - सावदे, ता. भडगाव : येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र परदेशी यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या ज्वारीच्या चाऱ्याला अचानक भीषण...
जळगाव 
सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

मंठा  प्रतिनिधी - सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
राज्य 
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी ) मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
जळगाव 
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कजगाव प्रतिनिधी - कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध...
जळगाव 
कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न