शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गेल्या ९ वर्षापासुन अविरत उपक्रम

Shailendra Thakur Picture
On

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर -राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक.घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात.पण ज्या बहिणी रुग्णालयात आजारी अवस्थेत आहेत,ज्यांचं कुटुंब जवळ नाही किंवा आर्थिक अडचणींमुळे त्या एकट्याच उपचार घेत आहेत,त्यांच्यासाठी हा सण केवळ आठवणीत राहतो पण अशाच भावनिक क्षणी माणुसकी समुहाच्या 'भावंडांनी' शासकीय रुग्णालयात जाऊन या बहिणींना राखी बांधत औषधी,साड्या आणि प्रेमाची भेट दिली.गेल्या ९ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम यंदाही सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेच्या वतीने व ज्युनिअर चार्ली फाउंडेशन तसेच माणुसकी समुह यांच्या सहकार्याने राबवण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात घाटी रुग्णालयातील मेडिसिन बिल्डिंग मधील महिला वॉर्ड क्रमांक ४ येथे उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना राखी बांधून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले.या वेळी प्रत्येक महिलेला "एक राखी, एक साडी" या उपक्रमाअंतर्गत साडी भेट देण्यात आली.तसेच काही रुग्णांना औषधासाठी १०० रु प्रमाणे ची आर्थिक मदतही देण्यात आली.यामुळे त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.एक महिला रुग्ण, ज्यांचा भाऊ वर्षांपूर्वीच दिवंगत झाला होता, त्या म्हणाल्या –

"आम्ही तीन बहिणी… पण भाऊ गेला आणि राखी साजरी करणं थांबलं.आज भाऊ गेल्यानंतर पहिल्यांदा पुन्हा राखी बांधली. आज जणू माणुसकीच्या रूपात भाऊ परत आलाय… ही राखी मी आयुष्यभर विसरणार नाही!" असे बोलतांना अश्रु अनावर झाले 

कार्यक्रमात ज्युनिअर चार्ली फाउंडेशन चे अध्यक्ष (सोमनाथ स्वभावणे) यांनी आपल्या हास्यविनोद आणि अभिनयाच्या माध्यमातून रुग्णांना हसवलं, त्यांचं मन हलकं केलं.उपस्थित रुग्ण,नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांनी याचे भरभरून कौतुक केलं.या स्तुत्य उपक्रमासाठी समाजसेवक सुमित पंडित यांच्या नेतृत्वात माणुसकी समूहाने विशेष प्रयत्न केले.या उपक्रमासाठी खजाना साडी सेल चे मालक इनुस खत्री यांनी साड्यांचे सहकार्य केले.या कार्यक्रमाला प्रवीणा यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक बेगमपुरा,

देविदास पंडित,विजय निबाळकर,महादेव रदंवे,मनोज वखरे,राम पंडित,सौ.मिराबाई पंडित सौ.पूजा पंडित,लक्ष्मी पंडित यांच्यासह माणुसकी समूहाचे अनेक सदस्य उपस्थित होते.

संवादातून जाणून घेतलेल्या रुग्णांच्या समस्या

प्रविणा यादव,पोलीस निरीक्षक, बेगमपुरा यांनी या प्रसंगी महिला रुग्णांशी संवाद साधला व त्यांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी आधार दिला याप्रसंगी बोलताना सांगितले,

"आजच्या समाजात जेव्हा माणुसकी हरवत चालली आहे, तेव्हा रुग्णांसाठी राखी साजरी करणं हा एक अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रम आहे.सुमित पंडित व त्यांच्या माणुसकी टीमचे मनापासून अभिनंदन.मला स्वतःला या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने हे माझं भाग्य आहे.रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच खरं समाजकार्य आहे."

 माणुसकी समुहाच्या कार्यामुळे हजारो गरजुं रुग्णाना मदत मिळते

सुमित सारखे काही घटक समाजात माणुसकी जपण्याचे कार्य करतात त्यामुळे कितीतरी गरजुंपर्यंत मदत पोहचते आज

"या राखीच्या सणाला माणुसकीच्या धाग्यांनी जोडलेलं बंधन पाहिलं आणि मन भारावून गेलं.या समाजात अजूनही अशी माणसं आहेत जी निस्वार्थ सेवा करत आहेत.अशा समाजसेवकांच्या कार्यामुळे रुग्णांना आधार मिळतो आणि आमचा समाज अधिक संवेदनशील बनतो."

 प्रवीणा यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक,बेगमपुरा

IMG-20260828-WA0102IMG-20260828-WA0103

 

Edited By: Shailendra Thakur

खबरें और भी हैं

शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

ताजा बातम्या

शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

  छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी  छत्रपती संभाजीनगर -राखी पौर्णिमेचा सण म्हणजे भाऊ–बहिणीच्या नात्याचं प्रतीक.घरात सण साजरे होतात, गोडधोड वाटले जातात.पण ज्या बहिणी...
जळगाव 
शासकीय रुग्णालयात साजरी झाली माणुसकीची राखी आजारी बहिणींसाठी औषध,साड्या आणि प्रेमाची भेट

कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून रक्षाबंधन कार्यक्रम

      एसटी महामंडळ कर्मचारी व बेघर निवारा केंद्र जळगाव या दोन ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले जळगाव शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय...
जळगाव 
कट्टा सखी सुगरण ग्रुप कडून  रक्षाबंधन कार्यक्रम

ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,

बातमी वृत्त मनीषा पाटील यांच्याकडून जळगाव प्रतिनिधी शहरात कडक ऊन आणि पावसाची पर्वा न करता अहोरात्र वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक...
ऊन-पावसाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना ‘नारीशक्ती’तर्फे रक्षाबंधन,

आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी -गिरीष रमणलाल भावसार* जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचलित आर. आर. विद्यालय, जळगाव येथे दिनांक २७ ऑगस्ट...
जळगाव 
आर. आर. विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा