- Hindi News
- संशोधन पद्धतीवर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
संशोधन पद्धतीवर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
जळगाव प्रतिनिधी
जळगाव, दि. १२ ऑगस्ट २०२६ : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज, जळगाव व डॉ. वर्षा पाटील महिला होम सायन्स महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन पद्धती’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. नयना नितीन महाजन, प्राचार्य, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज तसेच प्रा. कविता देशमुख, प्राचार्य, डॉ. वर्षा पाटील महिला होम सायन्स महाविद्यालय यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रशांत विजयसिंह पाटील यांनी संशोधन विषयाची निवड, संशोधनाची रूपरेषा, योग्य संशोधन पद्धती, माहितीचे संकलन व विश्लेषण, गृहीतकांची चाचणी आणि निष्कर्ष मांडणी याबाबत मार्गदर्शन केले. या ऑनलाइन व्याख्यानास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या डॉ. कीर्ती धनंजय पाटील, ग्रंथपाल डॉ. ईश्वर राणे सर व कविता भोरटके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ललिता मधुकर सपकाळे यांनी केले, तर मीनल राणे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम अत्यंत माहितीपूर्ण व मार्गदर्शक ठरला.