- Hindi News
- मुंबई
- दूध आणि अन्न भेसळखोरांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कठोर निर्देश..
दूध आणि अन्न भेसळखोरांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कठोर निर्देश..
मुंबई प्रतिनिधी -
नागरिकांच्या आरोग्याशी आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत ('मकोका') कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे 'विकसित महाराष्ट्र २०४७' अंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
अन्नातील भेसळ हा केवळ साधा गुन्हा नसून थेट नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले की, बनावट पनीर आणि भेसळयुक्त दूध-अन्नपदार्थांमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना आमंत्रण मिळते. अशा समाजकंटकांवर कोणतीही नरमाई न दाखवता त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून 'मकोका' लावला पाहिजे, जेणेकरून त्यांना कायदेशीर पळवाटा मिळणार नाहीत आणि समाजात जरब बसेल.
न्यायालयीन प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी तातडीने ज्येष्ठ विधीतज्ज्ञांची एक विशेष 'लीगल टीम' तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री योगेश कदम, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.