- Hindi News
- श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
मुक्ताईनगर : श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे आज, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. उद्धव इंगळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. ए. महाजन, उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी, सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर आपल्या मनोगतात प्रा. उद्धव इंगळे यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या व बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे स्मरण केले. त्यांनी मिळवून दिलेले हे स्वातंत्र्य आपण जबाबदारीने जपले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य प्रो. डॉ. एच .ए.महाजन यांनी आपल्या मनोगतात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचे स्मरण केले. आजचा युवक ही देशाची शक्ती असून, देशाच्या प्रगतीमध्ये त्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. युवकांनी संघटित होऊन राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्यावे. सर्वांच्या प्रयत्नांतून उद्याचा भारत अधिक सक्षम, समृद्ध व प्रगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ध्वजारोहण प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी वनिता काळे, वेदिका भोसले आणि ममता मोरे तसेच माजी विद्यार्थी आनंद मराठे आणि अमोल गुंजाळ यांचे विशेष व मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाची संपूर्ण ध्वजारोहण कार्यवाही क्रीडा विभागाच्या प्रतिभा ढाके यांनी पार पाडली. त्यांच्या समवेत प्रा. राजन खेडकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजन व कार्यवाहीत सहकार्य केले.
स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात उत्साह, देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.