जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

घोसाला येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे निसर्गरम्य वातावरणात सेवा रुजू.

Shailendra Thakur Picture
On

सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ

 सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात श्रावण अष्टमीचे औचित्य साधून 'श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रा'तर्फे भव्य चंडीयाग सेवेचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात जवळपास ४०० हून अधिक सेवेकऱ्यांनी आई भगवतीची सेवा रुजू केली.

या जागृत देवस्थानाचे महात्म्य मोठे असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. गेल्या सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने यंदाही आई भगवतीची उच्च प्रकारची सेवा, दुर्गा सप्तशती हवन पाठ आणि श्रीयंत्र पूजन कुंकुमारजन सेवा करण्यात आली. कडे वडगाव येथील याद्निकी संदीप पाटील यांनी सर्व सेवेकऱ्यांकडून ही शास्त्रोक्त सेवा संपन्न करून घेतली.

या धार्मिक सोहळ्यासाठी पाचोरा, खडकदेवळा, डोंगरगाव, पिंपरी खुर्द, पिंपळगाव हरेश्वर, वाडी, शेवाळे, घोसला, कडेवडगाव, निमखेडी, बनोटी, सावखेडा, आणि सिल्लोड अशा विविध ठिकाणाहून सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गायकवाड आप्पा, जगन कोळी, बापू वाघ, भागवत दादा सिनकर, बंडू नाना, सागर पाटील, गौरव पाटील, गोपाल पाटील, दिपक गवळी, उमेश काटे, नितीन कोलते, भैय्या, गजानन तेली, नामदेव पवार, आणि संभा आप्पा यांनी अनमोल सहकार्य केले. तर गौरीताई कुलकर्णी व शिनकर ताई यांनी दुर्गा सप्तशतीचे वाचन केले.

अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता महाआरती आणि महाप्रसादाने झाली. उपस्थित भाविकांना संदीप पाटील यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले.

Edited By: Shailendra Thakur
www.maharashtrasarthi.com
20 Aug 2026 By Shailendra Thakur

https://www.maharashtrasarthi.com/the-chandiyag-ceremony-at-jogeshwari-mata-devasthanam-was-completed-with/article-168

खबरें और भी हैं

जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

ताजा बातम्या

जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

सोयगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर वाघ   सोयगाव दि. २० हजारो भाविकांचे जागृत देवस्थान असलेल्या, डोंगरांच्या मध्यभागी वसलेल्या पुरातन जोगेश्वरी माता मंदिरात या...
जोगेश्वरी माता देवस्थानात चंडीयाग सोहळा उत्साहात संपन्न

जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ६ सप्टेंबरला ‘सकळ ज्ञानमहोत्सव’

जळगाव प्रतिनिधी : जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सकळ ज्ञानमहोत्सव पुस्तक प्रकाशन सोहळा व...
जळगाव 
जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ६ सप्टेंबरला ‘सकळ ज्ञानमहोत्सव’

भुसावळ येथील कुमारी सुविधा राजू फालक हिच्या (‘Physiology of Cerebellum’) अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली शैक्षणिक कार्याला भारत सरकारचे कॉपीराइट प्रमाणपत्र

भुसावळ प्रतिनिधी- नाना पाटील सर   शरीरशास्त्र व न्यूरोफिजिओलॉजीच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली (‘Physiology of Cerebellum’ )या शैक्षणिक कार्याची भारत...
जळगाव 
भुसावळ येथील कुमारी सुविधा राजू फालक हिच्या (‘Physiology of Cerebellum’) अनुमस्तिष्काची कार्यप्रणाली शैक्षणिक कार्याला भारत सरकारचे कॉपीराइट प्रमाणपत्र

महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य..

मुंबई प्रतिनिधी - मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता व्यावहारिक मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या नियमाची...
मुंबई 