बळवंत महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ..

sandeep patil Picture
On

सांगली प्रतिनिधी -

बळवंत महाविद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. 
 यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण  आणि विकसित भारत २०४७ युवा शक्ती यावर विशेष भर देण्यात आला असून यानिमित्ताने हर घर तिरंगा अभियान, ९ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत ध्वजारोहन आणि वंदे मातरम गीत गायन,  एन . एस. एस. व एन.सी. सी. विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली असे विविध उपक्रम महाविद्यालयात राबवून मोठ्या दिमाखात हा सोहळा साजरा करण्यात आला. 
    महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. चंद्रकांत बोबडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. आपल्या अभिभाषणात प्राचार्य बोबडे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या, आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या सर्व महापुरुषांच्या कार्याची माहिती दिली.  उपस्थितांना व्यसनमुक्तीची,  आपला शालेय परिसर स्वच्छ व अंमली पदार्थ मुक्त ठेवण्याची शपथ दिली. 
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामचंद्र मुजमुले यांनी केले. कार्यक्रमास वरिष्ठ विभागाचे उपप्रचार्य डॉ.राजकुमार मरे, डॉ. अरविंद तपासे, डॉ. राणी किर्दत, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. अजित साळुंखे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा. राहुल पाटील, लेफ्टनंट डॉ. शंकर शेंडगे,कार्यालयीन प्रमुख विलास मासाळ, प्रा.आशिष देशमुख, प्रा. दीपक पवार तसेच महाविद्यालयातील सर्व सेवक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Edited By: sandeep patil
www.maharashtrasarthi.com
16 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/state/independence-day-was-celebrated-with-enthusiasm-in-balwant-college/article-154

खबरें और भी हैं

डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

ताजा बातम्या

डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

नवी दिल्‍ली - अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख...
राष्ट्रीय 
डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

भडगाव प्रतिनिधी - बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या...
जळगाव 
ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..

भडगाव प्रतिनिधी - कजगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात...
जळगाव 
कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान..

मुंबई प्रतिनिधी  - क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल...
मुंबई 