- Hindi News
- जळगाव
- उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रानमळा शाळेचे दोन विद्यार्थी चमकले..
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रानमळा शाळेचे दोन विद्यार्थी चमकले..
भुसावळ प्रतिनिधी -
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यावर्षी रानमळा शाळेतील दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले असल्याची माहिती मुख्याध्यापक श्री भास्कर बुरसे यांनी दिली आहे. गौरी शैलेश बनकर (248 गुण) आणि लोकेश नितीन शिंदे (240 गुण) हे 2 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले असून यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री बाबाजी मारूती शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले , विस्तार अधिकारी नंदा चासकर , केंद्रप्रमुख स्मिता लोंढे , ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यादवराव शिंदे , सरपंच प्रमोद शिंदे , उपसरपंच रोहिणी दौंडकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ वाघोले , उपाध्यक्ष स्वाती शिंदे , राष्ट्रपती पारितोषिक विजेते विस्ताराधिकारी जिजाराम शिंदे , शंकर शिंदे , मिलिंद शिंदे , बाजीराव शिंदे , रामदास शिंदे , अरविंद दौंडकर , राजेश दौंडकर , विकास भुजबळ , प्रकाश शिंदे , दत्तात्रय शिंदे , शिवाजी शिंदे , राजाराम जाधव , विशाल सांडभोर , रोहिणी बनकर , श्रद्धा वाघोले , आरती सुकाळे , अक्षदा सुकाळे , स्वाती शिंदे , कामिनी सुकाळे व पालकांनी अभिनंदन केले. वर्षभर सातत्याने उत्तम मार्गदर्शन करून शिष्यवृत्ती यशाची 25 वर्षांची अखंडित परंपरा कायम ठेवल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट , पंचायत समिती सदस्य शंकर कावडे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना भास्कर बुरसे , उत्तम पाषाणकर , नीलिमा सुतार , सलिम शेख , दिव्या भुजबळ यांचेही मार्गदर्शन लाभले.