- Hindi News
- जळगाव
- जळगाव भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा.
जळगाव भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा.
जळगाव प्रतिनिधी -गिरीश भावसार
दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयाच्या वतीने भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तथा जिल्हा मुख्य आयुक्त श्री निलेश पाटील साहेब यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मा. शिक्षणाधिकारी साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये स्काऊट यांना स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय राजवटीतून मुक्तता नव्हे, तर ती आपल्या कर्तव्याची जाणीव आणि जबाबदारीने जगण्याची संधी आहे. या दिवशी आपण आपल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करूया आणि एक सुजाण नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत आपले योगदान देण्याचा संकल्प करण्या बाबत सांगितले. कार्यक्रमाला मा.श्री दत्तात्रय सोनवणे -जिल्हा सहसचिव, मा.गोसावी सर - सहा.जिल्हा आयुक्त, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती बागुल मॅडम, जिल्हा संघटक गाईड श्रीमती वैशाली अवथळे, जिल्हा संघटक स्काऊट श्री अर्पित कडू, कनिष्ठ लिपीक श्री संदीप पाटील, कनिष्ठ लिपीक श्रीमती कविता पाटील, शिपाई श्री प्रणव गंगाखेडकर, चौकीदार श्री श्याम भोलाने तसेच प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव आणि प्रगती माध्यमिक विद्यालय, जळगाव चे स्काऊट मास्टर व स्काउट्स उपस्थित होते.कार्यक्राचे विशेष म्हणजे मा. शिक्षणाधिकारी साहेब यांनी स्वतः मुलांना बोलावून त्यांच्या अभ्यासासंबंधी अडचणी विचारून त्या दूर करण्यात आल्या. तसेच प्रश्नोत्तराच्या स्वरूपात स्काऊट सोबत हितगुज केली. शेवटी मेसेंजर ऑफ पिस च्या माध्यमातून आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे बाबतचा संदेश देण्यात आला. शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.