- Hindi News
- जळगाव
- कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..
कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..
भडगाव प्रतिनिधी -
कजगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका गजला परवीन इलीयास खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले.
यावेळी उपस्थित लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन यांनी शाळेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवून देण्याचे आश्वासन दिले. माजी सरपंच मनोज धाडीवाल यांनी शाळेसाठी सोलर प्लांट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच /पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन यांनी शाळेला साउंड सिस्टीम देण्याचे आश्वासन दिले. राजेंद्र चव्हाण यांनी शाळेच्या इमारतीवर आकर्षक रंगकाम करून शाळेचे नाव उठावदार पद्धतीने लिहून देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात अहेले सुन्नत कंजूल ईमान बहुउद्देशीय संस्था, कजगाव यांच्या वतीने विद्यार्थिनींना स्कार्फ/हिजाबचे वाटप करण्यात आले. मुस्तकीम अय्युब मणियार यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आय-कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच मोहसीन अब्दुल खालिक मणियार यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान मांगीलाल मोरे यांनी संविधानाच्या प्रतीबाबत मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन होते. यावेळी माजी सरपंच मनोज धाडीवाल, पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष भानुदास महाजन, माजी पंचायत समिती सदस्य अशोक पुन्हा सोनवणे, उपसरपंच सादिक मणियार, ग्रामपंचायत सदस्य, हाजी शफी मणियार, मांगीलाल मोरे, दिनेश पाटील, पुंडलिक सोनवणे, पत्रकार प्रणव शिंदे ,पत्रकार अमीन शाह, रफिक भाऊ, , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मन्नान खाटीक व सदस्य, तसेच राजेंद्र चव्हाण, सफ्फार मौलाना, नाजीम मणियार, फरीद बेलदार, अबरार खाटीक, आरीफ मलिक, अमजद शाह, हारून बागवान, आसिफ पिंजारी, मुस्तकीम मणियार, मोहसीन मणियार, फारुख बागवान यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक बुऱ्हाण शेख, सादिया बेगम खालील अहेमद व शाहिना आकीफ खान यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
देशभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि शाळेच्या विकासासाठी देण्यात आलेल्या विविध आश्वासनांमुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन कजगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेसाठी विशेष ठरला.