- Hindi News
- जळगाव
- कजगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..
कजगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा..
भडगाव प्रतिनिधी -
कजगाव ग्रामपंचायतीच्या वतीने देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सरपंच रघुनाथ महाजन व ग्राम विकास अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत तिरंग्याला मानवंदना दिली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त घोषणांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. दरम्यान, अण्णा साठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ढोल-ताशा व शहनाईचे वादन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यानंतर कजगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयाच्या प्रांगणात शफी दादा मण्यार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाला सरपंच रघुनाथ महाजन, माजी सरपंच मनोज धाडीवाल, उपसरपंच सादिक मण्यार, जिल्हा परिषद विद्यालयाचे प्राचार्य सुनील महाजन सर, ग्रामपंचायत सदस्य शफी दादा मण्यार, पुंडलिक सोनवणे, दिनेश टेलर, संभाजी पवार, विजय गायकवाड, मांगीलाल मोरे, रेशन दुकानदार दादाभाऊ पाटील, पत्रकार प्रणव शिंदे, महिला ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील पत्रकार बंधू, अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
“देशभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कजगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला