ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

sandeep patil Picture
On

भडगाव प्रतिनिधी -

बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे उपाध्यक्ष दिनकरराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक भाऊसो प्रकाशजी हिरण, श्री. स्वप्नील पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, कजगावचे सरपंच रघुनाथ महाजन, उपसरपंच सादिकदादा मण्यार, ग्रामपंचायत सदस्य शफी दादा, मांगीलाल मोरे, दिनेश पाटील, राजेंद्र चव्हाण, पुंडलिक सोनवणे,
 विजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आण्णा.भाऊ बोरसे तसेच पत्रकार प्रणव शिंदे, पत्रकार नाना पाटील, पत्रकार नितीन सोनार, महिला ग्रामपंचायत सदस्य, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गैरप्रकार टाळून कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी प्राचार्य बी. के. पाटील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. पी. गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य एस. एस. केदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन बी. एस. पाटील यांनी मानले.

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून उत्तेजनार्थ ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी प्राचार्य बी. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्याचे महत्त्व, विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि शैक्षणिक जीवनात प्रामाणिकपणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Edited By: sandeep patil
www.maharashtrasarthi.com
16 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/jalgaon/baj-hiran-celebrated-with-enthusiasm-in-the-school/article-159

खबरें और भी हैं

डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

ताजा बातम्या

डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

नवी दिल्‍ली - अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख...
राष्ट्रीय 
डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

भडगाव प्रतिनिधी - बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या...
जळगाव 
ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..

भडगाव प्रतिनिधी - कजगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात...
जळगाव 
कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान..

मुंबई प्रतिनिधी  - क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल...
मुंबई 