भटाणे येथे ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष; माजी सैनिकांचा सत्कारसह २०० वृक्षांचे वाटप..

sandeep patil Picture
On

त-हाडी प्रतिनिधी -

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून झुआरी कंपनीच्या वतीने भटाणे गावात ‘जय जवान, जय किसान’ अभियानांतर्गत माजी सैनिकांचा सत्कार तसेच वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशसेवेत योगदान देणाऱ्या माजी सैनिकांचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात भटाणे गावाचे सरपंच श्री. संजय पाटील, पोलीस पाटील श्री. धनराज पाटील, माजी सैनिक कृष्णा छगन कोळी (आर्मी हवालदार), माजी सैनिक श्री. सतीश नाटू देवरे (बीएसएफ कॉन्स्टेबल), कृषी सहाय्यक सौ. ललिता पवार, श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी तसेच पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांच्या उपस्थितीत झाली.
पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे मार्केटिंग मॅनेजर श्री. किरण राठोड यांनी सीमेवर देशाचे रक्षण करणारे जवान आणि देशाचे पोषण करणारे शेतकरी यांचे महत्त्व अधोरेखित करत ‘जय जवान, जय किसान’चा जयघोष केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून जवान, शेतकरी आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले.
श्री कृषी विकास केंद्र, शिरपूरचे संचालक श्री. राजेंद्र भंडारी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शेती सजीव आणि सुपीक ठेवायची असेल तर जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खतांचा योग्य समतोल राखणे गरजेचे असून, जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय घटकांचा वापर वाढवावा, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनाबाबत बोलताना भंडारी यांनी प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात किमान दहा झाडे लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले. तसेच महिलांनीही विविध सामाजिक, कृषी आणि विकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ‘चूल आणि मूल’ या पारंपरिक चौकटीबाहेर येत प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे माजी सैनिक आणि गावातील शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आलेले वृक्षारोपण. यावेळी २०० वृक्षांचे वाटप गावातील शेतकऱ्यांना करण्यात आले. प्रत्येक शेतकऱ्याला एक वृक्ष देऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत परिसरातही मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील मोठ्या संख्येने शेतकरी, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशसेवकांचा सन्मान, शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश या त्रिसूत्री उपक्रमामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारादीप फॉस्फेट लिमिटेडचे जय किसान कृषी सल्लागार श्री. जगदीश लोहार यांनी केले. उपस्थित मान्यवर, शेतकरी, महिला व ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

Edited By: sandeep patil
www.maharashtrasarthi.com
16 Aug 2026 By sandeep patil

https://www.maharashtrasarthi.com/state/chanting-of-jai-jawan-jai-kisan-at-bhatane-and-distribution/article-149

खबरें और भी हैं

डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

ताजा बातम्या

डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

नवी दिल्‍ली - अनेक महिने चाललेल्या तपासात सरकारी महसुलाची अंदाजे 2,500 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचे उघड; अंदाजे 75 लाख...
राष्ट्रीय 
डीआरआयने सुपारी आयातीत साफ्टा कराराचा मोठ्या प्रमाणावर झालेला बेकायदेशीर वापर आणला उघडकीस....

ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

भडगाव प्रतिनिधी - बबनबाई जवरीलाल हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या...
जळगाव 
ब.ज. हिरण विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा..

कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..

भडगाव प्रतिनिधी - कजगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात...
जळगाव 
कजगाव येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न..

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान..

मुंबई प्रतिनिधी  - क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचं औचित्य साधून महसूल विभागानं राज्यभरात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल...
मुंबई 