- Hindi News
- जळगाव
- जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ६ सप्टेंबरला ‘सकळ ज्ञानमहोत्सव’...
जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात ६ सप्टेंबरला ‘सकळ ज्ञानमहोत्सव’
पुस्तक प्रकाशन सोहळ्यासह शिक्षक, व्यावसायिक व गुणवंतांचा होणार सन्मान.
जळगाव प्रतिनिधी :
जनमत प्रतिष्ठाण व वेदांत एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सकळ ज्ञानमहोत्सव पुस्तक प्रकाशन सोहळा व शिक्षक, व्यावसायिक गुणवंतांचा सत्कार-२०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय, अल्पबचत भवन येथे करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे सहावे वर्ष असून शिक्षण, ज्ञान, सामाजिक योगदान तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
ज्ञान, शिक्षण आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या ज्ञानमहोत्सवात पुस्तक प्रकाशनासोबतच शिक्षक, व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे. त्यामुळे शिक्षण व सामाजिक क्षेत्रासाठी हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माजी डायट प्राचार्य मा. श्री. निळकंठ आप्पा गायकवाड असणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शहराचे आमदार मा. श्री. राजूमामा भोळे, जळगावच्या महापौर मा. सौ. दीपमाला काळे आणि माजी महापौर व राज विद्यालयाच्या संचालिका मा. सौ. जयश्रीताई महाजन राहणार आहेत.
कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी जि.प. जळगाव मा. श्री. विजय पवार, प्राचार्य डायट जळगाव मा. श्री. डॉ. अनिल झोले, राजयोगी कॉलेजचे मा. श्री. प्रा. रफीक शेख, ओबीसी सेल उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा. श्री. उमेशभाऊ नेमाडे, युवा नेतृत्व मा. श्री. विवेक मंगलसिंग सोनवणे, जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे मा. श्री. एस. डी. भिरूड, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. सौ. केतकीताई पाटील, प्राचार्य खिरोदा मा. श्री. अतुल मालखेडे सर, विधितज्ज्ञ मा. श्री. अॅड. निखिल पाटील, अनुभूती शाळा पी.आर.ओ. मा. सौ. रुपालीताई वाघ, विज्ञान प्रसारक मा. श्री. दिलीप भारंबे, माजी नगराध्यक्ष भुसावळ मा. सौ. गायत्रीताई भंगाळे, न्यू इंग्लिश स्कूल नशिराबादचे मा. श्री. यागेश पाटील तसेच पारोळ्याचे मा. श्री. डॉ. संदीप पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ज्ञान आणि गुणवत्तेचा गौरव करण्याचा उपक्रम
आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गुणवंतांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन यांच्या वतीने मागील सहा वर्षांपासून ज्ञान, शिक्षण आणि गुणवत्तेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदाचा ‘सकळ ज्ञानमहोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना एकत्र येण्याची संधी मिळणार असून, नव्या पिढीला ज्ञान, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत बडगुजर सर करणार असून कार्यक्रम वेळेवर सुरू होणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्ञान आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक जनमत प्रतिष्ठान व वेदांत एज्युकेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.