- Hindi News
- जळगाव
- भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन'चे रक्तदान शिबिर संपन्न...
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन'चे रक्तदान शिबिर संपन्न; पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव प्रतिनिधी
पुणे :भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पुणे येथे एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 'स्व.सौ. श्वेता वाणी-नेवे फाऊंडेशन, जळगाव' आणि 'नोबेल ब्लड सेंटर, हडपसर, पुणे' यांच्या संयुक्त विद्यमाने साकोरे नगर येथील 'ललवाणी वास्तू' येथे हे शिबिर उत्साहात पार पडले. राष्ट्रीय सणाचे औचित्य साधत अनेक देशभक्तांनी आणि नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नोबेल ब्लड सेंटरचे डॉ. वाकचौरे, सिस्टर स्वाती, सविता, रेश्मा खान, अरुण वाळूंज आणि पीआरओ प्रवीण जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ललवाणी वास्तू सोसायटीचे अध्यक्ष सुहास हिवरकर, सचिव किरण वाणी आणि उदय नाईक यांनी शिबिराच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.याप्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष मिलिंद वाणी आणि संचालक तुषार नेवे प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनासारख्या पवित्र दिवशी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.