- Hindi News
- जळगाव
- फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पुणे प्रतिनिधी
पुणे- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फुरसुंगी येथील अष्टविनायक सिटीमध्ये 'आपले आरोग्य आमचे ध्येय' या विशेष आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. नोबेल हॉस्पिटल (हडपसर, पुणे) आणि स्व. सौ. श्वेता वाणी नेवे फाउंडेशन (जळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अष्टविनायक सिटीमधील सर्व सभासदांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
मोफत चाचण्या आणि सवलतींचा लाभ
शिबिरामध्ये नागरिकांसाठी वजन, उंची, रक्तदाब (BP), ईसीजी (ECG), फिजिशियन कन्सल्टेशन, डेंटल कन्सल्टेशन आणि रँडम शुगर या अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य चाचण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासोबतच, नागरिकांच्या सुविधेसाठी विशेष वैद्यकीय चाचण्या जसे की व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D3, सीबीसी (CBC), कॅल्शियम, कोलेस्टेरॉल, टीएसएच (थायरॉईड), २डी इको (2D Echo) आणि टीएमटी (TMT) यांवर तब्बल ३० टक्के विशेष सूट देण्यात आली होती. नोबेल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉ.ऋषिकेश कावडे, परिचारका कु स्टेला संतोष,आरती रंजू,सुस्मिता दास,व टिम कडून रुग्णांची सखोल वैद्यकीय तपासणी करून त्यांना योग्य ते औषधोपचार व मोलाचे मार्गदर्शन केले.
मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्य प्रसंगी
स्व. सौ. श्वेता वाणी-नेवे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. मिलिंद नेवे-वाणी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी नोबेल चे एझीकेटीवह श्री राजकुमार मणवर व अष्टविनायक सिटी परिवारातील श्री. अंकुश अहिरे, श्री. रघुनाथ गायकवाड आणि निवृत्त आरोग्य अधिकारी श्री. साक्षर मस्के सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सोसायटीतील बहुसंख्य नागरिकांनी, मातांनी आणि बालकांनी या शिबिराचा मोठा लाभ घेत आपले आरोग्य सुरक्षित केले. 'निरोगी रहा... आनंदी रहा!' हा मोलाचा संदेश देत या यशस्वी शिबिराची सांगता झाली.