केबीसीच्या मंचावर जळगावचा डंका; भूषण ठाकरे ठरला अठराव्या पर्वाचा पहिला करोडपती!

एक कोटींचे बक्षीस आणि चारचाकी गाडी जिंकली; सात कोटींच्या प्रश्नापर्यंत मजल, संघर्षमय प्रवासातून तरुणाने घडविला इतिहास

Maharashtra Sarthi Team Picture
On

kbc-photo

जळगाव : जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे जळगाव जिल्ह्यातील भूषण ईश्वर ठाकरे याने सिद्ध करून दाखविले आहे. लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’च्या (केबीसी) अठराव्या पर्वात एक कोटी रुपये जिंकत भूषणने या सीजनचा पहिला करोडपती होण्याचा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे, त्याने चारचाकी गाडीदेखील जिंकली असून, सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भूषण हा जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बलवाडी गावचा रहिवासी आहे. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या भूषणला लहानपणापासूनच आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करावा लागला. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्याला नदीपात्रात रेती उपसण्याचे कामही करावे लागले. मात्र, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षणाची आवड आणि मोठे स्वप्न पाहण्याची जिद्द त्याने सोडली नाही. ज्ञान मिळविण्याची धडपड आणि काहीतरी वेगळे करून दाखविण्याची महत्त्वाकांक्षा त्याने कायम जपली.
कुंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाने मिळाली नवी दिशा
भूषणच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती भुसावळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक कुंदन पाटील यांच्या भेटीनंतर. भूषणची कौटुंबिक परिस्थिती आणि त्याच्यातील बुद्धिमत्ता व गुणवत्ता ओळखून पाटील यांनी त्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊन शिक्षण सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी केवळ प्रवेश मिळवून देण्यापुरती मदत केली नाही, तर सातत्याने मार्गदर्शन करून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला. मोठे ध्येय गाठण्यासाठी त्याला प्रेरित केले. या पाठबळामुळे भूषणला आयुष्याला नवी दिशा मिळाली.
‘काहीतरी बनल्याशिवाय घरी जाणार नाही! ’
भूषणच्या जिद्दीची प्रचिती त्याच्या एका निर्धारातून येते. वसतिगृहात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तब्बल दीड वर्ष तो एकदाही घरी गेला नाही. ‘काहीतरी बनल्याशिवाय मी घरी जाणार नाही, ’ असा ठाम निर्धार त्याने अधीक्षक कुंदन पाटील यांच्यासमोर व्यक्त केला होता. परिस्थिती बदलण्याची आणि कुटुंबासाठी काहीतरी मोठे करून दाखविण्याची त्याची जिद्द या निर्णयातून स्पष्ट झाली.
संघर्षातून करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास
एकेकाळी उदरनिर्वाहासाठी नदीपात्रात कष्ट करणारा भूषण आज देशातील लोकप्रिय कार्यक्रमाच्या मंचावर पोहोचला आहे. केबीसीमध्ये त्याने एक कोटी रुपयांचे बक्षीस आणि चारचाकी गाडी जिंकून मोठे यश संपादन केले. सात कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचल्याने त्याच्या कामगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे.
भूषणचे यश हे केवळ त्याच्या मेहनतीचे आणि बुद्धिमत्तेचे फलित नाही, तर गरजू विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता ओळखून त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन दिल्यास तेही मोठी भरारी घेऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. शासकीय वसतिगृह हे केवळ निवास आणि भोजनाचे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारे व्यासपीठ ठरू शकते, हे भूषणने आपल्या यशातून दाखवून दिले आहे.

खबरें और भी हैं

 केबीसीच्या मंचावर जळगावचा डंका; भूषण ठाकरे ठरला अठराव्या पर्वाचा पहिला करोडपती!

ताजा बातम्या

केबीसीच्या मंचावर जळगावचा डंका; भूषण ठाकरे ठरला अठराव्या पर्वाचा पहिला करोडपती!

जळगाव : जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे जळगाव जिल्ह्यातील भूषण...
जळगाव 
 केबीसीच्या मंचावर जळगावचा डंका; भूषण ठाकरे ठरला अठराव्या पर्वाचा पहिला करोडपती!

देशातील विजेच्या मागणीत ११.७ टक्क्यांची वाढ; महाराष्ट्रात मार्चमध्ये २, १३७ मेगावॉट तुटीचा अंदाज

मुंबई : देशातील विजेची मागणी सातत्याने वाढत असून, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत...
मुंबई 
देशातील विजेच्या मागणीत ११.७ टक्क्यांची वाढ; महाराष्ट्रात मार्चमध्ये २, १३७ मेगावॉट तुटीचा अंदाज

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वेसेवा; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत पूर्ण होणार

नवी दिल्ली : प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील जनकपूर धाम यांना आता थेट रेल्वेने जोडले...
राष्ट्रीय 
अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वेसेवा; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत पूर्ण होणार

मुंबई पोलीस दल होणार अधिक स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

मुंबई : पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Accountability) येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स...
मुंबई 
मुंबई पोलीस दल होणार अधिक  स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण