चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

पाचशेहून अधिक दुर्गसेवकांचा सहभाग; संयुक्त सर्वेक्षणाची तारीख त्वरित जाहीर करण्याची मागणी

sandeep patil Picture
On

चोपडा प्रतिनिधी -

दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीपासून सलग तीन दिवस चौगाव किल्ल्यावर गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात तालुक्यातील पाचशेहून अधिक दुर्गसेवकांनी सहभागी होत ऐतिहासिक वारशाप्रती श्रद्धा आणि गडसंवर्धनाची बांधिलकी व्यक्त केली.

सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, ६ नोव्हेंबर रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, चोपडा यांच्या वतीने गडपूजन करण्यात आले. सकाळी सात वाजता चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुर्गसेवक एकत्र आले. महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी चौगाव किल्ल्याकडे प्रस्थान केले.

प्रारंभी तीर्थक्षेत्र त्रिवेणी महादेव मंदिरात पूजन करण्यात आले. त्यानंतर किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराला तोरण बांधून परिसराची स्वच्छता करण्यात आली. रांगोळी काढून आई भवानी मंदिरात आरती करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने गडपूजनाचा सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला ३०० हून अधिक दुर्गसेवकांची उपस्थिती होती. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवन देसले, श्यामभाऊ परदेशी, अनिल वानखेडे, चौगावचे पोलीस पाटील गोरख हरचंद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संयुक्त सर्वेक्षण रखडल्याने दुर्गसेवकांमध्ये नाराजी

चौगाव किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा तसेच पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी विविध दुर्गसंवर्धन संघटनांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप किल्ल्याच्या संयुक्त सर्वेक्षणाची तारीख निश्चित झालेली नाही. त्यामुळे दुर्गसेवकांनी तीव्र नाराजी चे फटाके फोडले. शासन व संबंधित प्रशासनाने संयुक्त सर्वेक्षणाची तारीख तातडीने जाहीर करावी, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली आहे.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

ताजा बातम्या

चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

चोपडा प्रतिनिधी - दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीपासून सलग तीन दिवस चौगाव किल्ल्यावर गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात तालुक्यातील...
जळगाव 
चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

मुंबई प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ई सिगारेट्सच्या आयातीची खेप रोखली. या बाबत अधिकाऱ्यांनी...
राष्ट्रीय  मुंबई  क्राईम 
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात  4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

कजगाव प्रतिनिधी - सावदे, ता. भडगाव : येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र परदेशी यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या ज्वारीच्या चाऱ्याला अचानक भीषण...
जळगाव 
सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

मंठा  प्रतिनिधी - सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
राज्य 
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा