जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

महसूल गुप्तचर संचालनालयाने केली कारवाई

sandeep patil Picture
On

मुंबई प्रतिनिधी -

महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ई सिगारेट्सच्या आयातीची खेप रोखली. या बाबत अधिकाऱ्यांनी गुप्त माहिती मिळाली होती.  या मालाची खेप मॉप रॉड (Mop Rod) या उत्पादनाची असल्याचे फसवेपणाने घोषित केले गेले होते. मात्र अधिकाऱ्यांनी संबंधित कंटेनरची काटेकोर तपासणीत केल्यावर मॉप रॉड या घोषित उत्पादनामागे लपवलेले युटो थॅनोस (Yuoto Thanos) या ब्रँडचे 6,000 ई सिगारेट्स आणि युटो लेन्स (Yuoto Lens) या ब्रँडच्या 7,000 ई सिगारेट्स आढळून आल्या.

या कारवाईत एकूण 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे 13,000 ई सिगारेट्स आणि त्यासोबतचा इतर माल सीमाशुल्क कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत जप्त करण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी आणि लोकांना आरोग्याच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी ई सिगारेट्स (प्रतिबंध, उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक आणि जाहिरात) कायदा, 2019 अंतर्गत भारतात इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स आणि सर्व इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टीम्सवर बंदी घालण्यात आली आहे.

2026-27 या चालू आर्थिक वर्षात, महसूल गुप्तचर  संचलनालयाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील विविध बंदरे, विमानतळ आणि कंटेनर तळांच्या ठिकाणांहून 135 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे सुमारे 3,55,000 ई सिगारेट्स जप्त केले आहेत.

या कारवाईतून, सीमेपलीकडून होणाऱ्या तस्करीविरोधात लढा देण्याची आणि देशाच्या आर्थिक तसेच सार्वजनिक आरोग्य हितांचे रक्षण करण्याची महसूल गुप्तचर संचलनालयाची सातत्यपूर्ण वचनबद्धताही अधोरेखित झाली आहे.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात  4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

ताजा बातम्या

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

मुंबई प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ई सिगारेट्सच्या आयातीची खेप रोखली. या बाबत अधिकाऱ्यांनी...
राष्ट्रीय  मुंबई  क्राईम 
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात  4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

कजगाव प्रतिनिधी - सावदे, ता. भडगाव : येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र परदेशी यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या ज्वारीच्या चाऱ्याला अचानक भीषण...
जळगाव 
सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

मंठा  प्रतिनिधी - सामाजिक सलोखा, शांतता आणि एकजुटीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या 'एक गाव एक गणपती' या संकल्पनेचा आदर्श घालून देणाऱ्या...
राज्य 
हेलस गावाची 'एक गाव एक गणपती'ची १३८ वर्षांची ऐतिहासिक परंपरा

जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - ( मदन लाठी ) मा. आमदार श्री. गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या गणेश मंडळाला सदिच्छा भेट देऊन...
जळगाव 
जळगाव चे पालकमंत्री यांची भोकर ला श्री च्या आरतीस उपस्थिती