- Hindi News
- क्राईम
- नांदेडमधील विविध सराफा पेढ्यांवर भारतीय मानक ब्युरोची (बीआयएस) झडती आणि जप्तीची कारवाई
नांदेडमधील विविध सराफा पेढ्यांवर भारतीय मानक ब्युरोची (बीआयएस) झडती आणि जप्तीची कारवाई
नागपूर प्रतिनिधी -
अनिवार्य हॉलमार्किंग आदेशाच्या (Mandatory Hallmarking Order) उल्लंघनाच्या कथित प्रकरणी भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) नागपूर शाखा कार्यालयाने 18 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेडमधील सराफा बाजारातील विविध प्रतिष्ठानांवर झडती घेऊन जप्तीची कारवाई केली. नागपूर शाखा कार्यालयाचे संचालक आणि प्रमुख डॉ. मनोज कुमार रजक यांच्या मार्गदर्शनाखाली दहा सदस्यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. या शोध पथकाचे नेतृत्व सहसंचालक रौनक सुखदेवे यांनी केले. पथकातील इतर सदस्यांमध्ये सहसंचालक निशा कणबरगी, सहसंचालक आशिष उरेवार, गणेश बरवाड, माया बोके, हर्षदा पाटील, प्राजक्ता सांगळे, ऋषिकेश पोपटे, ऐश्वर्या बांबोळे आणि पारस दोमडे यांचा समावेश होता.
या कारवाईदरम्यान, एचयूआयडी (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन – हॉलमार्कचा विशिष्ट ओळख क्रमांक) नसलेले सोन्याचे दागिने आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले. भारतीय मानक ब्युरो कायदा आणि अनिवार्य हॉलमार्किंग आदेशातील संबंधित तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
