डीआरआय'कडून नवी दिल्लीत सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशाकडून 22 किलो कोकेन जप्त

अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या परदेशी महिलेला अटक

sandeep patil Picture
On

नवी दिल्‍ली प्रतिनिधी -

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी टोळ्यांविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनायाने, सिएरा लिओनवरून आलेल्या एका परदेशी महिलेला पकडले असून तिच्याकडून 22 किलो वजनाचे कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात या अंमली पदार्थांची किंमत अनेक कोटी रुपये असल्याचे मानले जात आहे. या कारवाईतून एक अत्यंत धूर्त आणि धाडसी पद्धत उघड झाली आहे, ज्यामध्ये विमानतळावरील सुरक्षा तपासणी टाळण्यासाठी बनावट राजकीय ओळखपत्रांचा वापर केला जात होता.

संबंधित महिला, आपण एक राजकीय कुरियर असल्याचा दावा करत होती. तिच्याकडे एक मोठी ब्रीफकेससदृश पेटी होती, ज्यावर डिप्लोमॅटिक मेल आणि अधिकृत परवानगीशिवाय उघडू नये, अशा आशयाचे मजकूर लिहिलेले होते. तपासणी टाळण्यासाठी तिने काही बनावट कागदपत्रेही सादर केली, ज्यामध्ये हा माल संयुक्त राष्ट्रांच्या एका राजकीय कुरियरचा असल्याचे नमूद केले होते.

 

प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी नियमांनुसार त्या ब्रीफकेसची कसून तपासणी केली. या तपासणीदरम्यान, प्लास्टिकच्या अनेक थरांमध्ये लपवून ठेवलेली 22 पाकिटे सापडली. या पाकिटांमध्ये पांढऱ्या रंगाचे, विटेच्या आकाराचे पदार्थ होते; प्राथमिक चाचणीत हे पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले.

कोकेनची ही 22 पाकिटे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस ॲक्ट, 1985 अंतर्गत जप्त करण्यात आली आहेत. संबंधित महिलेलाही याच कायद्यान्वये अटक करून सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

डीआरआय'कडून नवी दिल्लीत सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशाकडून 22 किलो कोकेन जप्त

ताजा बातम्या

डीआरआय'कडून नवी दिल्लीत सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशाकडून 22 किलो कोकेन जप्त

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी टोळ्यांविरुद्धच्या एका मोठ्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनायाने, सिएरा लिओनवरून आलेल्या एका परदेशी...
राष्ट्रीय  क्राईम 
डीआरआय'कडून नवी दिल्लीत सिएरा लिओनवरून आलेल्या प्रवाशाकडून 22 किलो कोकेन जप्त

चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

चोपडा प्रतिनिधी - दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीपासून सलग तीन दिवस चौगाव किल्ल्यावर गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात तालुक्यातील...
जळगाव 
चौगाव किल्ल्यावर तीन दिवसीय गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

मुंबई प्रतिनिधी - महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय ) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत संशयित ई सिगारेट्सच्या आयातीची खेप रोखली. या बाबत अधिकाऱ्यांनी...
राष्ट्रीय  मुंबई  क्राईम 
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्स्ट बंदरात  4 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या सुमारे 13,000 ई सिगारेट्स जप्त..

सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!

कजगाव प्रतिनिधी - सावदे, ता. भडगाव : येथील शेतकरी विठ्ठल रामचंद्र परदेशी यांच्या शेतात साठवून ठेवलेल्या ज्वारीच्या चाऱ्याला अचानक भीषण...
जळगाव 
सावदे येथे ज्वारीच्या चाऱ्याला भीषण आग; हजारो पेंढ्या जळून खाक!