मुंबई पोलीस दल होणार अधिक स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

Maharashtra Sarthi Team Picture
On

HXo1iGubEAAyaI5-1024x720 मुंबई : पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Accountability) येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’ टॅब्लेट वितरण, मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली, सिटीझन ॲपच्या माध्यमातून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करणे आणि नागरिकांना जलद व प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध तंत्रज्ञानाधारित सुविधांची सुरुवात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव केला. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानसंवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाईत गुणात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच एआयच्या मदतीने ‘तपास सारथी’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे. नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने ‘हॅश व्हॅल्यू’च्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया ‘एंड-टू-एंड डिजिटल’ करण्यावर भर देण्यात येत असून सीसीटीव्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, डेटा डिक्रिप्शन, सोशल मीडिया विश्लेषण करून गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस दलाची डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे. दरम्यान बेलचे मुख्य व्यवस्थापक राकेश कुमार, वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक अनिता के. एस., किशोर कुमार नारु, कॅप्सूल टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक नितीन कामत आणि अर्जुन के. आर.; स्केयुटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य प्रभू आणि दीपाली केळकर; तसेच मिनीटेकचे उपाध्यक्ष प्रीतम करवीर व प्रकल्प प्रमुख मयुर कुलकर्णी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच अत्याधुनिक अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’चा समावेश आहे. अँटी-नार्कोटिक्स सेलच्या (ANC) ताफ्यातील नवीन फॉरेन्सिक वाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले.

खबरें और भी हैं

मुंबई पोलीस दल होणार अधिक  स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

ताजा बातम्या

मुंबई पोलीस दल होणार अधिक स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

मुंबई : पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Accountability) येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स...
मुंबई 
मुंबई पोलीस दल होणार अधिक  स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’...
मुंबई 
राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

धुळे :  देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलाचे जवान जयेश माळी यांना आज त्यांच्या...
राज्य 
मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

स्मार्टफोनच्या किमतीत मोठी वाढ; प्रीमियम मोबाईल लाखाच्या पार जाण्याची शक्यता!

नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात मोबाईल फोनच्या किमतीत मोठी वाढ होण्याची...
राष्ट्रीय 
स्मार्टफोनच्या किमतीत मोठी वाढ; प्रीमियम मोबाईल लाखाच्या पार जाण्याची शक्यता!