नाशिकच्या प्रसिध्द मिसळ सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे..

sandeep patil Picture
On

नाशिक प्रतिनिधी -

नाशिक शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. अस्वच्छता, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा वापर आणि अन्न साठवणुकीची अपुरी व्यवस्था या गंभीर कारणांमुळे नाशिकमधील तीन प्रसिद्ध मिसळ सेंटरसह एकूण पाच आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.  अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध भागांतील मिसळ सेंटर आणि हॉटेल्सवर अचानक छापे टाकून तपासणी केली. या तपासणीदरम्यान शहरातील श्याम सुंदर मिसळ, विहार मिसळ आणि तुषार फूड हब या तीन मिसळ उपहारगृहांसह आडगाव नाका येथील हॉटेल महाराज काठियावाडी आणि कृषी नगर येथील कॅफे दुर्गा या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले.  अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि ऋतुजा येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.

Edited By: sandeep patil

खबरें और भी हैं

मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

ताजा बातम्या

मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

धुळे :  देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलाचे जवान जयेश माळी यांना आज त्यांच्या...
राज्य 
मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

स्मार्टफोनच्या किमतीत मोठी वाढ; प्रीमियम मोबाईल लाखाच्या पार जाण्याची शक्यता!

नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात मोबाईल फोनच्या किमतीत मोठी वाढ होण्याची...
राष्ट्रीय 
स्मार्टफोनच्या किमतीत मोठी वाढ; प्रीमियम मोबाईल लाखाच्या पार जाण्याची शक्यता!

नाशिकच्या प्रसिध्द मिसळ सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे..

नाशिक प्रतिनिधी - नाशिक शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलली...
राज्य  क्राईम 
नाशिकच्या प्रसिध्द मिसळ सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे..

उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’

मुंबई :  काल रात्री मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावरील वाहतूक रात्री नऊ वाजल्यापासून विस्कळीत झाल्याने उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अनेक प्रवासी अडकून...
मुंबई 
उंबरमाळी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावली ‘लालपरी’