राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

Maharashtra Sarthi Team Picture
On

Aditi-Tatkare-768x521

मुंबई :  राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’ करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

अंगणवाडी केंद्रांमधून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य, पूर्वप्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती महिला, स्तनदा मातांना पोषण,आरोग्याशी संबंधित सेवा दिल्या जातात. आदर्श अंगणवाडी केंद्र तयार करून त्यात आधुनिक सुविधा देत बालकांना आनंददायी, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राबविण्यात येत आहे. शासकीय जागेत विद्युत जोडणी उपलब्ध असलेल्या केंद्रांचा विचार करून  ३,८३२ अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या स्मार्ट अंगणवाडी किटमध्ये विविध आधुनिक सुविधा आणि साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ई-लर्निंगसाठी आवश्यक हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हात धुण्यासाठी बेसिन सुविधा, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, इमारतीची आवश्यक किरकोळ दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण याबाबींचा समावेश आहे.

अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी टप्प्याटप्प्याने स्मार्ट अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येत असून बालकांच्या पोषण, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षणासाठी अधिक गुणवत्तापूर्ण वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

खबरें और भी हैं

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

ताजा बातम्या

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’...
मुंबई 
राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

धुळे :  देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलाचे जवान जयेश माळी यांना आज त्यांच्या...
राज्य 
मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

स्मार्टफोनच्या किमतीत मोठी वाढ; प्रीमियम मोबाईल लाखाच्या पार जाण्याची शक्यता!

नवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात मोबाईल फोनच्या किमतीत मोठी वाढ होण्याची...
राष्ट्रीय 
स्मार्टफोनच्या किमतीत मोठी वाढ; प्रीमियम मोबाईल लाखाच्या पार जाण्याची शक्यता!

नाशिकच्या प्रसिध्द मिसळ सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे..

नाशिक प्रतिनिधी - नाशिक शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावले उचलली...
राज्य  क्राईम 
नाशिकच्या प्रसिध्द मिसळ सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे..