अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वेसेवा; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत पूर्ण होणार

Maharashtra Sarthi Team Picture
On

1200-675-28167871-thumbnail-16x9-ayodhya-janakpur-train-routeनवी दिल्ली : प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील जनकपूर धाम यांना आता थेट रेल्वेने जोडले जाणार आहे. भारत आणि नेपाळमधील धार्मिक व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘जनकपूर धाम-अयोध्या कॅन्ट एक्सप्रेस’ (१५५९५/१५५९६) या नवीन रेल्वेसेवेचा प्रारंभ २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या रेल्वेचे नियमित संचालन २८ नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे.
रेल्वे बोर्डाने या साप्ताहिक एक्सप्रेस गाडीच्या संचालनाला मंजुरी दिली आहे. जनकपूर धाम ते अयोध्या कॅन्टदरम्यानचे सुमारे ६०४ किलोमीटरचे अंतर ही गाडी जवळपास १९ तासांत पूर्ण करणार आहे. त्यामुळे दोन्ही धार्मिक शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवासादरम्यान रेल्वे बदलण्याची आवश्यकता राहणार नाही.
गाडी क्रमांक १५५९५ जनकपूर धाम येथून शनिवारी दुपारी १.१० वाजता सुटेल. जयनगर, सीतामढी, नरकटियागंज आणि गोरखपूर या प्रमुख स्थानकांवर थांबत रविवारी सकाळी ८.१० वाजता अयोध्या कॅन्ट येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक १५५९६ अयोध्या कॅन्ट येथून सायंकाळी ५.५० वाजता सुटून गोरखपूर आणि जयनगरमार्गे मंगळवारी दुपारी १२.४० वाजता जनकपूर धाम येथे पोहोचेल.
ही रेल्वे भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणार असल्याने प्रवाशांच्या ओळखपत्रांची आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी जयनगर स्थानकावर केली जाणार आहे. यासाठी जनकपूर-अयोध्या प्रवासात एक तास, तर अयोध्या-जनकपूर प्रवासात दोन तासांचा थांबा देण्यात आला आहे. या थेट रेल्वेसेवेमुळे भाविकांसह पर्यटकांची सोय होणार असून, भारत आणि नेपाळमधील धार्मिक पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

खबरें और भी हैं

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वेसेवा; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत पूर्ण होणार

ताजा बातम्या

अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वेसेवा; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत पूर्ण होणार

नवी दिल्ली : प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या आणि माता सीतेचे जन्मस्थान असलेल्या नेपाळमधील जनकपूर धाम यांना आता थेट रेल्वेने जोडले...
राष्ट्रीय 
अयोध्या-जनकपूरदरम्यान थेट रेल्वेसेवा; ६०४ किमीचा प्रवास १९ तासांत पूर्ण होणार

मुंबई पोलीस दल होणार अधिक स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

मुंबई : पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Accountability) येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स...
मुंबई 
मुंबई पोलीस दल होणार अधिक  स्मार्ट; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मुंबई :  राज्यातील अंगणवाडी केंद्रात देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आधुनिक शैक्षणिक साहित्य आणि पायाभूत सुविधांची सुधारणा करत ३,८३२ अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी’...
मुंबई 
राज्यातील ३,८३२ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’ – मंत्री आदिती तटकरे

मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!

धुळे :  देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या धुळे तालुक्यातील रामी गावचे सुपुत्र, भारतीय सैन्यदलाचे जवान जयेश माळी यांना आज त्यांच्या...
राज्य 
मणिपूरमध्ये वीरमरण आलेल्या २५ वर्षीय जवान जयेश माळींना रामी गावात शासकीय इतमामात अखेरचा निरोप!