श्रमदानाच्या ‘७५ मिया’ रस्त्यावर फळबाग वाहन तीन तास अडकले!

११५ शेतकऱ्यांचा घाम आणि पैसा वाया, तीव्र आंदोलनाचा इशारा

Maharashtra Sarthi Team Picture
On

IMG-20261127-WA0010

सोयगाव (प्रतिनिधी) : शासकीय मंजुरी आणि निधीच्या प्रतीक्षेत न राहता सोयगाव तालुक्यातील घोसला येथील शेतकऱ्यांनी स्वखर्च, लोकवर्गणी आणि श्रमदानातून तब्बल पाच किलोमीटरचा ‘७५ मिया’ पांदन रस्ता उभारला. या स्वावलंबनाची आणि प्रशासनाच्या उदासीनतेची वाचा फोडणारी बातमी प्रसिद्ध होऊनही यंत्रणेला जाग आलेली नाही. उलट, आज याच पांदन रस्त्यावरून फळबागेचा माल घेऊन जाणारे वाहन रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तब्बल तीन तास अडकून पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. अखेर ट्रॅक्टरच्या मदतीने तासन्तास कसरत करत हे वाहन बाहेर काढावे लागले; मात्र या घटनेने प्रशासनाचा ‘भांडेफोड’ करत बळीराजाच्या संतापाचा कडेलोट केला आहे.

‘पाठपुराव्या’चे दावे पोकळ; तीन तासांची जीवघेणी कसरत

सोयगाव-चाळीसगाव चौफुली ते ७५ मिया दर्गापर्यंतचा हा मार्ग शिवारातील ११५ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मातोश्री आणि बळीराजा पांदन रस्ता योजनांसाठी दोन वेळा रीतसर प्रस्ताव सादर करूनही रस्त्याला नंबर व मंजुरी मिळालेली नाही. गटविकास अधिकारी शिवाजी यमुलवाड यांनी प्रलंबित प्रस्तावाची चौकशी करून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत मंजुरीनंतर काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात हा पाठपुरावा केवळ कागदावरच राहिल्याचे आज स्पष्ट झाले.

आज सकाळी शेतातील फळबागेचा माल भरून वाहन नेत असताना कच्च्या व खडबडीत रस्त्यावर ते खोलवर रुतून बसले. वाहन काढण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थांना तब्बल तीन तास प्रचंड कसरत करावी लागली. शेवटी ट्रॅक्टर लावून ओढल्यानंतरच गाडी बाहेर निघू शकली. ज्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःचा पैसा खर्च केला, घाम गाळला आणि श्रमदान केले, त्याच रस्त्यावर माल वाहतूक करताना इतका मनस्ताप सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या वेदना असह्य झाल्या आहेत.

अभियंत्यांची पाहणी आणि ग्रामस्थांचा स्वावलंबी लढा

यापूर्वी अभियंता राजेश राजगुरू यांनी अनेकदा पाहणी केली होती; तरीही मंजुरी रखडली. संभाव्य दुष्काळाच्या छायेत आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली व जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून रस्ता सुसज्ज करण्याचा प्रयत्न केला होता. या कामात सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील प्रमोद वाघ यांच्यासह गोरखभाऊ चव्हाण, भूषण बावस्कर, देवा बावस्कर, युवराज मातेरे आदींनी पुढाकार घेतला होता. मात्र, प्रशासनाच्या अनास्थेमुळे तात्पुरती डागडुजीही टिकू शकलेली नाही.

आम्ही स्वतःच्या पैशातून, लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून पाच किमीचा रस्ता तयार केला; पण आज फळबागेची गाडी काढताना तीन तास प्रचंड त्रास सहन करावा लागला. प्रशासनाला आता तरी जाग येईल का? दोन वेळेस प्रस्ताव देऊनही मंजुरी मिळत नसेल आणि नुसत्या पाठपुराव्याच्या गप्पा मारल्या जात असतील, तर आम्हाला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल. प्रश्न तातडीने सुटला नाही, तर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल."

— किशोर पाटील व प्रमोद वाघ, शेतकरी सामाजिक कार्यकर्ते

मुख्य घडामोडी थोडक्यात

प्रशासकीय स्थिती : दोन वेळा प्रस्ताव सादर करूनही मंजुरी व नंबर नाही; गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही ठोस कारवाईचा अभाव

शेतकऱ्यांचा इशारा : तातडीने मंजुरी व कायमस्वरूपी काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा पवित्रा  

प्रमुख मागणी : प्रशासनाने केवळ आश्वासने व कागदोपत्री पाठपुरावा न करता ७५ मिया पांदन रस्त्याच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी द्यावी, निधी उपलब्ध करून रस्ता कायमस्वरूपी दर्जेदार करावा आणि ११५ शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी, अशी तीव्र मागणी आता सर्वत्र जोर धरत आहे.

खबरें और भी हैं

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ताजा बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

बुलढाणा (प्रतिनिधी)  राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात शेतकऱ्याला...
राज्य 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे...
राष्ट्रीय 
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..

मुंबई प्रतिनिधी - संपर्क मंत्रालयाच्या दूरसंवाद विभागाने, आपल्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राच्या (मुंबई एलएसए) माध्यमातून देशव्यापी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा स्पर्धेची घोषणा...
राज्य 
दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..